Next
‘शालेय वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारावा’
प्रेस रिलीज
Wednesday, December 06 | 12:23 PM
15 0 0
Share this story

हॅम रेडिओ क्लबचे उद्घाटन करताना अब्दूर रेहमान, अनंत भिडे, नंदकुमार काकिर्डे, विलास रबडेपुणे : ‘देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. त्याच जोरावर अनेक वैज्ञानिकांनी मोलाचे योगदान दिले. आजच्या युवापिढीने शालेय वयापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारला, तर भारत जलद गतीने महासत्ता बनू शकेल,’ असे प्रतिपादन महा‌राष्ट्र पोलीस वायरलेस विभागाचे पोलीस महानिरीक्षक अब्दूर रेहमान यांनी केले.

रेडिओचे जनक सर जगदीशचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्र व मराठी विज्ञान परिषद यांच्या वतीने सेनापती बापट रस्त्यावरील विज्ञानशोधिका केंद्रात उभारण्यात आलेल्या हॅम रेडिओ क्लबचे उद्घाटन रेहमान यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

हॅम रेडिओ क्लबची पाहणी करताना अब्दूर रेहमान, अनंत भिडे, नंदकुमार काकिर्डे, विलास रबडेया वेळी खोडद येथील ‘जीएमआरटी’चे तंत्रज्ञ सुधीर फाकटकर यांचे ‘रेडिओचा जनक : सर जगदीशचंद्र बोस’ यावर सचित्र व्याख्यान झाले. या प्रसंगी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ ‌डॉ. गोविंद स्वरूप, भारतीय विद्याभवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे, ‘मुक्तांगण’चे संचालक अनंत भिडे, इनोव्हेशन हबचे उपसंचालक संदीप नाटेकर, हॅम ऑपरेटर विलास रबडे आदी मान्यवर उपस्थित होते.

रेहमान म्हणाले, ‘दहशतवादी कारवायांचा कट रचणाऱ्या, अफवा पसरवणाऱ्या आणि अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या वाईट प्रवृत्तीचा तात्काळ शोध घेता यावा; तसेच कायदा व सुव्यस्था सक्षम ठेवता यावी, यासाठी लवकरच ‘मोबाईल लोकेटर’ची सुविधा उभारली जाणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचा वायरलेस विभाग अतिशय सक्षम आहे. इतर राज्यातील अनेक पोलीस येथे प्रशिक्षणासाठी येतात. वायरलेस यंत्रणेला अधिक आधुनिक आणि सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’

२५८ बोस यांच्या संशोधनाची प्रतिकृती दाखविताना सुधीर फाकटकर‘सर जगदीशचंद्र बोस यांनी रेडिओचा शोध लावला; मात्र, या शोधनाचा मानवजातीला अधिक फायदा झाला पाहिजे, या हेतूने त्यांनी त्याचे अधिकार नोंदवले नाहीत. परिणामी पुढे मार्कोनीने त्यात काही सुधारणा करत रेडिओचा शोध आपल्या नावावर नोंदवला; परंतु बोस यांनी मार्कोनीच्या कित्येक वर्षे आधीच तांत्रिक संवादाची दारे खुली केली होती. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र यांसह इतर अनेक विषयात बोस यांचा सखोल अभ्यास होता. ते व्यासंगी साहित्यिकही होते,’ असे सुधीर फाकटकर यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले. विलास रबडे आणि सहकाऱ्यांनी हॅम रेडिओची प्रात्यक्षिके दाखविली.

संदीप नाटेकर यांनी प्रास्ताविक केले. विश्वास काळे यांनी त्या काळातील इतर वैज्ञानिकांचे योगदान सांगितले. डॉ. स्वरूप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भाग्यश्री लताड यांनी सूत्रसंचालन केले. श्रद्धा कुलकर्णी यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link