Next
छत्रपती संभाजी महाराज
BOI
Friday, November 02, 2018 | 09:58 AM
15 0 0
Share this article:

हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. शिवरायांचे पुत्र संभाजी महाराज यांनी स्वराज्याची धुरा सांभाळली; पण त्यांच्या कारकिर्दीची सुरुवातच स्वकीयांच्या कटकारस्थानांपासून झाली. स्वराज्याची घडी व्यवस्थित लावीत असतानाच मोगल बादशाह औरंगजेबाच्या स्वारीचे संकट त्यांच्यासमोर उभे ठाकले. त्याला हिमतीने, शौर्याने यशस्वीपणे तोंड देणाऱ्या संभाजी महाराजांची दैदीप्यमन संघर्षकथा प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण यांनी ‘छत्रपती संभाजी महाराज’मधून कथन केली आहे.

स्वराज्य उभारणीसाठी शिवाजी महाराजांनी केलेल्या संघर्षाचे वर्णन यात आहे. हाच वारसा संभाजी महाराजांकडे आला. शंभूराजांचा जन्म, बालपण, शिक्षण व कुटुंब, तसेच १६७४ ते १६८० या काळातील युवराज संभाजीराजे यांच्यासंदर्भातील घटना आल्या आहेत. संभाजी महाराजांची १६८० ते १६८९ ही नऊ वर्षांची कारकीर्द धकाधकीची व वादळी ठरली. या काळातील त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था, ग्रंथसंपदा याचा आढावा घेत परकीय शक्तींशी त्यांनी दिलेल्या लढ्याचे वर्णन केले आहे. संभाजी महाराजांचा मुख्य लढा हा औरंगजेबाशी झाला. औरंगजेबाच्या स्वारी ते संभाजी महाराजांचा मृत्यूपर्यंतची कथा यात सांगितली आहे.
      
प्रकाशन : महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी
पृष्ठे : ३१२
मूल्य : ३०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 138 Days ago
Important contribution to the history of this period We need more studies of this petiod. One book cannot deal with all the aspects T
0
0

Select Language
Share Link
 
Search