Next
फार्ली मोव्हाट
BOI
Saturday, May 12 | 09:46 AM
15 0 0
Share this story

आर्क्टिक कॅनडाच्या बर्फाळ प्रदेशातल्या शोधमोहिमांवर आधारित पुस्तकं लिहून लोकप्रिय झालेल्या फार्ली मोव्हाटचा १२ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...
.......
१२ मे १९२१ रोजी ऑन्टरिओमध्ये (कॅनडा) जन्मलेला फार्ली मोव्हाट हा लेखक आणि पर्यावरणप्रेमी म्हणून प्रसिद्ध होता. त्याचं लेखन तब्बल ५२ भाषांमध्ये अनुवादित झालं आहे आणि त्याच्या पुस्तकांच्या दीड कोटींहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे. कॅनडाच्या उत्तर भागात १९४०च्या दशकात त्याने काढलेल्या मोहिमेवर आधारित ‘पीपल ऑफ द डीअर’ या पहिल्याच पुस्तकाने त्याला लोकप्रियता मिळवून दिली होती.
 
पुढे त्याने पुन्हा एकदा आर्क्टिक कॅनडाच्या बर्फाळ भागात मोहीम काढून तिथल्या ध्रुवीय लांडग्यांचा अभ्यास केला आणि त्यावर आधारित लिहिलेलं ‘नेव्हर क्राय वूल्फ’ हे पुस्तकही अफाट लोकप्रिय झालं. त्यावर सिनेमाही बनला होता. त्याने ग्रीन पार्टी ऑफ कॅनडासाठी मोठं योगदान दिलं. तो पक्का पर्यावरणप्रेमी होता. 

दी रेजिमेंट बुक, लॉस्ट इन दी बॅरन, दी डॉग हू वूडंट बी, आउल्स इन दी फॅमिली, ऑरडिअल बाय आइस, दी कर्स ऑफ दी व्हायकिंग ग्रेव्ह, वेस्टव्हायकिंग, दी डेस्परेट पीपल, कॉपरमाइन जर्नी, दी रॉक विदीन दी सी, सी ऑफ स्लॉटर, नो मॅन्स रिव्हर, बे ऑफ स्पिरिट्स, बॉर्न नेकेड, अशी त्याची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

त्याला कॅनडा सरकारकडून ‘ऑफिसर ऑफ दी ऑर्डर ऑफ कॅनडा’ या मानाने गौरवण्यात आलं होतं. सहा मे २०१४ रोजी त्याचा मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link