Next
हिमायतनगरमध्ये भाजपची कार्यकर्ता बैठक; पक्षवाढीसाठी झोकून देऊन काम करण्याचा संदेश
नागेश शिंदे
Wednesday, August 14, 2019 | 06:59 PM
15 0 0
Share this article:हिमायतनगर : 
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचा झंझावात संपूर्ण भारतात सुरू असून, राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गेल्या साडेचार वर्षांतील कामकाज खूप चांगले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील भाजपची ताकदसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पक्षवाढीसाठी सर्वांनी पक्षाला स्वतःचा परिवार समजून स्वतःला झोकून दिले, तर निश्चितच हिमायतनगर तालुक्यात पक्षाला चांगले दिवस येण्यासाठी वेळ लागणार नाही,’ असे प्रतिपादन भाजपचे नांदेड प्रभारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिरात भाजपचे संघटन, बूथप्रमुख आणि शक्तिकेंद्रांच्या प्रमुखांची बैठक नुकतीच झाली. या बैठकीला नांदेड जिल्हा प्रभारी नाना देशपांडे यांच्यासह जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण ठक्करवाड, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा भारती पवार, माधव साठे आदींची प्रमुख उपस्थिती होती.‘हातात असलेल्या संधीचे सोने करण्याची ही वेळ आहे. विधानसभा निवडणुकीत केवळ मोदी पॅटर्नवर अवलंबून राहून चालणार नाही. आपल्याला अधिक मेहनत घ्यावी लागेल. तळागाळातील सामान्य नागरिकांच्या सहवासात राहून पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे,’ असे देशपांडे म्हणाले.

‘माजी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांच्या उपस्थितीत भाजप सदस्य नोंदणीची सुरुवात करण्यात आली. सदस्य नोंदणीला तालुक्यासह विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वच कार्यकर्त्यांनी भाजप सदस्य नोंदणीसाठी एका विचाराने काम करणे गरजेचे आहे. जेवढ्या जास्त संख्येने सदस्यांची नोंदणी होईल, त्याचा फायदा येणाऱ्या काळात पक्षाला होणार आहे,’ असे देशपांडे म्हणाले. अन्य मान्यवरांनीही उपस्थितांना मार्गदर्शनपर भाषणे केली. या बैठकीला भाजपचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान, भाजपचे जिल्हा चिटणीस सुधाकर पाटील-सोनारीकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गजानन तुप्तेवार, डॉ. प्रसाद डोंगरगांवकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, शहराध्यक्ष खंडू चव्हाण, किशनराव पाटील-वानखेडे, किशोर रायेवार, बालाजी ढोणे, साहेबराव चव्हाण, मधुकर पांचाळ, संतोष डोल्हारीकर, अरविंद उमाटे, परमेश्वर सूर्यवंशी, दत्ता शिराणे, अनंता कदम, संजय गुंडेकर, कांबळे आदी या वेळी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search