Next
अमिताभ बच्चन यांनी फेडले शेतकऱ्यांचे चार कोटींचे कर्ज
महाराष्ट्रानंतर आता उत्तर प्रदेशातील १३९८ शेतकऱ्यांचा भार हलका
BOI
Wednesday, November 21, 2018 | 12:03 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : काही दिवसांपूर्वीच विदर्भातील ३५० शेतकऱ्यांचे कर्ज फेडणारे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आता उत्तर प्रदेशातील १३९८ शेतकऱ्यांचे कर्ज फेडले आहे. या कर्जाची एकत्रित रक्कम तब्बल ४.०५ कोटी रुपये एवढी आहे. अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे ही माहिती दिली आहे. 

कर्ज एकरकमी फेडले गेल्याचे पत्र (वन टाइम सेटलमेंट लेटर) बँकांकडून शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. त्यापैकी निवडक ७० शेतकऱ्यांना उत्तर प्रदेशातून मुंबईत आमंत्रित करून हे पत्र अमिताभ बच्चन यांच्या हस्ते दिले जाणार आहे. त्यांना आणण्यासाठी खास रेल्वेडब्याची सोयही अमिताभ बच्चन यांनी केली आहे. 

‘कृतज्ञता म्हणून शेतकऱ्यांचा थोडा भार हलका करण्याची इच्छा होती. जेव्हा ठरवल्यानुसार एखादे काम होते, तेव्हा आंतरिक शांतता लाभते,’ असे अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. 

‘कौन बनेगा करोडपती’च्या ‘कर्मवीर’ मालिकेत सहभागी झालेल्यांच्या कार्याचाही आपल्यावर प्रभाव पडल्याचे अमिताभ यांनी म्हटले आहे. कर्करुग्णांची काळजी घेणारे एच. के. सावला, स्वतःच्या मुलांनीच दूर केलेल्या ज्येष्ठांची काळजी घेणारी रवी कालरा, ‘ब्रिटल बोन्स’ हा दुर्धर आजार असूनही जिद्दीने गाणारा १५ वर्षांचा स्पर्श शहा या सर्वांचा उल्लेख त्यांनी केला आहे. 

काही दिवसांपूर्वीच अमिताभ यांनी विदर्भातील ३५० शेतकऱ्यांच्या डोक्यावरच्या कर्जाचा भार हलका केला होता. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आपल्याला शक्य ते करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच, ४४ हुतात्म्यांच्या कुटुबीयांनाही त्यांनी आर्थिक मदत केली होती. काही महिन्यांपूर्वी केरळमध्ये आलेल्या आपत्तीत त्यांनी केरळला ५१ लाखांची मदत दिली होती. 

(अमिताभ बच्चन यांच्याबद्दलचा विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search