Next
कुडवळपाडा शाळेत मातृदिन व साक्षरता दिन साजरा
मिलिंद जाधव
Tuesday, September 11, 2018 | 01:40 PM
15 0 0
Share this storyभिवंडी :
प्रत्येक जण आईचे उपकार आपल्या आयुष्यात कधीच फेडू शकत नाही. म्हणून आपल्या आदर्श आईबद्दल आदरभाव व्यक्त करण्यासाठी, तसेच तिला स्वतःचे नाव लिहिता यावे, यासाठी ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील वडवली शैक्षणिक केंद्रामधील कुडवळपाडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत मातृदिन व साक्षरता दिन साजरा करण्यात आला. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या आईला शाळेत आमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले शुभेच्छापत्र आईला भेट म्हणून दिले. नंतर आईला कुंकमतिलक करून प्रत्येक विद्यार्थ्याने आईला वंदन करून आईबद्दल असलेला आदर आपल्या भाषणातून व्यक्त केला. अशा वेगळ्या पद्धतीने मातृदिन व साक्षरता दिन साजरा करण्यात आला.

ज्या महिलांना अजूनही स्वतःचे नाव लिहिता येत नाही, त्यांनी वेळ असेल तेव्हा शाळेत येऊन शिकावे, असे आवाहन करून शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल डोके यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग भला, सदस्य मंगल भला, पांडुरंग खोडके, तसेच शिक्षक, कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक गायकवाड यांनी केले, तर आभारप्रदर्शन बेबी मोहपे यानी केले. हा कार्यक्रम मुख्याध्यापिका मंगल डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
vandana About 159 Days ago
अप्रतीम !
0
0
Subhash Ladakya varatha About 160 Days ago
Matrudin & saksharta din ekdam mast very good .Asech changale program karat raha.programla Hardik subhechha .. .
0
0
Rupali Rohidas patil. KP Wadavli About 160 Days ago
Kupach sundar. Upkram navinyapurn
0
0

Select Language
Share Link