Next
‘झेन्सार टेक्नॉलॉजीज’ची बुद्धिबळात बाजी
प्रेस रिलीज
Saturday, April 14 | 06:20 PM
15 0 0
Share this story



पुणे : कॉर्पोरेट कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना वैयक्तिक आणि सांघिक खेळांमधील कौशल्याची चुणूक दाखवण्याची संधी देणाऱ्या ‘कॉर्पोरेट कार्निव्हल’ या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात बुद्धिबळाच्या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांमध्ये चुरस रंगली. बुद्धिबळाच्या अटीतटीच्या अशा सात फेऱ्यांनंतर ‘झेन्सार टेक्नोलॉजीज’च्या ओंकार पटवर्धन यांनी ६.५ गुणांसह प्रथम क्रमांकावर बाजी मारत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

या स्पर्धेत ‘दासॉल्ट सिस्टिम्स’चे मिराल शेवली यांनी सहा गुणांसह रौप्य पदक, तर ‘रँडस्टॅड इंडिया’चे वीरेंद्र भाटी यांनी ५.५ गुणांसह काँस्य पदक पटकावले. ‘फेअर सेन्स स्पोर्ट्स मॅनेजमेंट’ आणि ‘ट्विडल डिझायनोग्राफी’ यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या ‘कॉर्पोरेट कार्निव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल १०० कंपन्या या उपक्रमात सहभागी झाल्या असून, २२ एप्रिलपर्यंत दर शनिवारी व रविवारी चोंधे पाटील स्पोर्ट्स काँप्लेक्समध्ये विविध क्रीडास्पर्धा रंगणार आहेत.

टेबल टेनिसमध्ये पुरुष एकरी प्रकारात अर्पित गुप्ता (बीएनवाय मेलन), विवेक कश्यप (अॅसेंचर), वैभव दहिभाते (सेंट्रल एक्साईज अँड कस्टम्स), अर्पित श्रीवास्तव (बीएनवाय मेलन) यांनी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

‘बीएनवाय मेलन’चे अर्पित श्रीवास्तव यांनी ‘अॅसेंचर’च्या जय कोठारी यांचा ११-७, १३-११, ९-११, ६-११ आणि ११-७ अशा गुणांनी पराभव केला. अर्पित गुप्ता (बीएनवाय मेलन) यांनी अभिषेक परमार (दासॉल्ट सिस्टिम्स) यांच्यावर १३-११, ११-६, ११-९ असा विजय मिळवला. विवेक कश्यप (अॅसेंचर) यांनी कमल सिंग (अॅडियंट इंडिया) यांना ११-७, ११-८, ११-४ असे पराभूत केले, तर वैभव दहिभाते (सेंट्रल एक्साईज) यांनी सुधांशू (दासॉल्ट सिस्टिम्स) यांच्यावर ११-४, ११-७, ११-३ अशी मात केली.      

पुरूष दुहेरीमध्ये हरीन शहा व रौनक गोयंका (दॉईश बँक), जय कोठारी व विवेक कश्यप (अॅसेंचर), अर्पित गुप्ता व अर्पित श्रीवास्तव (बीएनवाय मेलन) आणि शैलेश देशपांडे व अभिषेक परमार (दासॉल्ट सिस्टीम्स) यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.

हरीन शहा आणि रौनक गोयंका (दॉईश बँक) यांनी कमल सिंग व सिद्धांत (अॅसेंचर) यांचा ११-७, ११-४ असा पराभव केला. जय कोठारी व विवेक कश्यप (अॅसेंचर) यांनी आशुतोष आणि हृषिकेश (ऑलस्टेट सोल्यूशन्स) यांच्यावर ११-५, ११-७ असा विजय मिळवला. अर्पित गुप्ता आणि अर्पित श्रीवास्तव (बीएनवाय मेलन) हे कार्तिक आणि संदीप (झेन्सार) यांच्याविरोधात ११-२, ११-६ अशा गुणांनी विजयी ठरले. तर शैलेश देशपांडे आणि अभिषेक परमार (दासॉल्ट सिस्टीम्स) यांनी प्रियांग वैद्य व चेतन सिंग (एशियन पेंट्स) यांच्यावर ११-१३, ११-०, ११-३ असे गुण मिळवत मात केली.        

फुटबॉलच्या ‘सेव्हन्स’ सामन्यांमध्ये बीएनवाय मेलन, एन्प्रो इंडस्ट्रीज, ऑलस्टेट सोल्यूशन्स आणि दॉईश बँक या कंपन्यांच्या संघांनी उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. या प्रत्येक संघाने गटपातळीवर प्रत्येकी तीन सामने खेळले आणि अटीतटीची लढत देत उपांत्य फेरीतील आपली जागा निश्चित केली. या स्पर्धेच्या उपांत्य फेऱ्या २२ एप्रिल रोजी होणार आहेत.

कार्निव्हलमधील सर्व स्पर्धांमध्ये मिळून सर्वाधिक गुणांची कमाई करणाऱ्या कंपनीस ‘कॉर्पोरेट ट्रॉफी’ प्रदान करून गौरवण्यात येणार आहे, तर स्पर्धांसाठी सर्वाधिक स्पर्धक उतरवणाऱ्या कंपनी ‘अॅक्टिव्ह एम्प्लॉयर अॅवॉर्ड’साठी पात्र ठरणार आहे. या उपक्रमास ‘पीएनबी हाउसिंग फायनान्स’, ‘कोलते पाटील डेव्हलपर्स’, ‘ह्युंदाई’ यांचे साहाय्य लाभले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link