Next
भाजपच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी अॅड. दीपक पटवर्धन यांची निवड
BOI
Monday, July 08, 2019 | 08:54 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी अॅड. दीपक मनोहर पटवर्धन यांची निवड झाल्याचे आठ जुलै रोजी जाहीर करण्यात आले. स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था, तसेच रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय या संस्थांचे अध्यक्ष असलेले अॅड. पटवर्धन हे रत्नागिरी भाजपचे जुने-जाणते पदाधिकारी आहेत. सहकार क्षेत्रातील अग्रणी असलेल्या या व्यक्तिमत्त्वाची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे भाजप कार्यालयात झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत निश्चित झाले. मावळते जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाळासाहेब माने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

माने म्हणाले, ‘माझी जिल्हाध्यक्षपदी निवड २०१४ला झाली होती. निवड तीन वर्षांसाठी होती; मात्र लोकसभा निवडणुकीमुळे मुदतवाढ मिळाली होती. या कालावधीत मी पक्षवाढीसाठी खूप प्रयत्न केले. सुमारे दोन लाख किलोमीटर प्रवास करून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. भाजपची स्वबळावरची मते वाढवण्यासाठी मेहनत घेतली.’

‘माझ्याकडचे पद गेले म्हणून मला दुःख नाही. कारण कार्यकर्ता हे पद कधीच जात नाही, असे नितीन गडकरी सांगतात. अॅड. पटवर्धन यांची निवड ही निवड प्रक्रियेनुसार झाली आहे. अॅड. पटवर्धन यांच्यासोबत मी तीस-पस्तीस वर्षे काम करत आहे. आता ते अध्यक्ष झाल्यावरही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे,’ असेही माने यांनी नमूद केले.

‘केंद्र व राज्यात सत्ता भाजपकडेच असल्यामुळे दोन्ही सरकारच्या योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचवणे, हे आमचे उद्दिष्ट आहे,’ असे माने म्हणाले.

आतापर्यंतच्या जिल्हाध्यक्षांच्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला काम करताना होणार आहे, अशी भावना अॅड. पटवर्धन यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘मी आणि बाळासाहेब १९८३पासून एकत्र काम करतोय. विधानसभा निवडणुकीवेळी आम्ही गुहागरची जागा मागणार आहोत. युतीच्या धोरणानुसार ही जागा आम्हाला मिळायला हवी, असे आमचे म्हणणे आहे. येत्या काळातील सर्व निवडणुका जिंकून सत्तास्थापनेसाठी आम्ही प्रयत्न करू.’

‘रत्नागिरी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद अडीच वर्षे शिवसेनेकडे होते. आता पुढील अडीच वर्षे भाजपला मिळावीत. यापूर्वीच्या युतीच्या फॉर्म्युल्यानुसार हे सूत्र योग्य ठरेल. त्यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे. रत्नागिरी नगरपालिका क्षेत्रामध्ये भाजपची ताकद मोठी आहे. त्याचा उपयोग नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत केला जाणार आहे,’ असेही अॅड. पटवर्धन यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Deepak Prabhakar Apte About 97 Days ago
अभिनंदन साहेब आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
0
0

Select Language
Share Link
 
Search