Next
‘डीकेटीई’च्या १३ विद्यार्थ्यांचे हॉफ विद्यापीठात प्रशिक्षण पूर्ण
प्रेस रिलीज
Wednesday, July 31, 2019 | 01:58 PM
15 0 0
Share this article:


इचलकरंजी : जर्मनीतील हॉफ युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस या विद्यापीठामध्ये ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाइल विभागातील १३ विद्यार्थी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करीत आहेत. ‘डीकेटीई’ आणि हॉफ युनिव्हर्सिटी यांच्यात झालेल्या कराराअंतर्गत गेली पाच वर्षे टेक्स्टाइलचे व इंजिनीअरिंगचे विद्यार्थी तेथे प्रशिक्षण घेण्यासाठी जात आहेत. 

वस्त्रोद्योगात सातत्याने अधुनिकीकरण होत आहे. त्याचा अभ्यास सातत्याने होणे गरजेचे आहे. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण काळात टेक्निकल टेक्स्टाइल्स, इनोव्हेटिव्ह टेक्स्टाइल्स, फिनिशिंग, सस्टेनेबल टेक्स्टाइल्स बिझनेस या विषयावर अभ्यास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थी जगभरातील विविध रिसर्च तज्ज्ञांशी विचारविनिमय करीत आहेत व त्यामुळे त्यांच्या संशोधनवृत्तीला चालना मिळत आहे. प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थी जर्मनीतील रिसर्च इन्स्टिट्यूट व इंडस्ट्रीजना भेट देत आहेत. हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना सर्वांगिण विकास साधण्यासाठी उपयुक्त ठरले आहे.

दिवसेंदिवस नैसर्गिक स्रोत लोप पावत आहेत, त्यामुळे वायू, सौरऊर्जा आदी रिनेव्हेबल एनर्जीचा वापर करून टेक्स्टाइल मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग करण्याचे तंत्रज्ञान जर्मनीत विकसित होत आहे. हॉफ विद्यापीठ या विषयावर संशोधन करीत असून, त्याचाही फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. 

जगात कापडाला फिनिशिंग देण्याच्या अत्याधुनिक पद्धतीचा व तंत्रज्ञानाचा विकास झाला आहे. हेमांशू जैन, कार्तिक महेश्‍वरी, रमेश चौधरी, आयुष कालिया, श्रीधर खंडेलवाल, दर्शित काकडीया, पूजा कोल्हापूरे, आशिष मालू, आदित्य व्यास, सिद्धार्थ जठार, शुभम मुंदडा, आदित्य आवाडे, केशव पारीक हे विद्यार्थी ‘हॉफ’ येथे प्रशिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना टेक्निकल टेक्स्टाइल्स, इनोव्हेटिव्ह टेक्स्टाइल्स फिनिशिंग, सस्टेनेबल टेक्स्टाइल्स बिझनेस या विषयावर अभ्यास करण्याची संधी लाभली आहे. 

संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर व्ही केतकर मानद सचिव डॉ. सपना आवाडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना डीकेटीई इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील, प्रा. डॉ. एम. वाय. गुडियावर यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. यात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. एस. बी. अकीवाटे यांचा महत्त्वाचा वाटा आहे.   
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search