Next
‘मांज्याने जखमी होणाऱ्या पक्ष्यांच्या बचावासाठी हेल्पलाइन’
डॉ. कल्याण गंगवाल यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रेस रिलीज
Friday, January 11, 2019 | 01:09 PM
15 0 0
Share this article:

पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. कल्याण गंगवालपुणे : ‘मकर संक्रातीच्या निमित्ताने पतंग उडविण्याची धामधूम सुरू झाली आहे. पतंग आणि मांजा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे; मात्र चीनी आणि नायलॉन मांजामुळे गेल्या काही वर्षांत अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. या मांजाच्या वापरावर कायद्याने बंदी आहे, तरीही छुप्या पद्धतीने हा चीनी मांजा विकला जात आहे. त्यामुळे माणसांच्या जीवावर बेतणार्‍या या चीनी मांजा विकणार्‍यांवर कठोर कारवाई करावी,’ अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी पत्रकार परिषदेत केली. या मांजामुळे जखमी होणार्‍या पक्ष्यांच्या बचावासाठी हेल्पलाइन सुरू केल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.

डॉ. गंगवाल म्हणाले, ‘जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पतंगबाजी करणार्‍यांची लगबग सुरू होते. बाजारात विविध प्रकारचा मांजा येतो. बोहरी आळीसह शहर आणि उपनगरांतील छोट्या-मोठ्या दुकानांत हा मांजा विकला जातो. यात बहुतांश मांजा चीनी किंवा नायलॉनचा असतो. त्यामुळे अपघातांचे प्रकार वारंवार घडताना आपण पाहिले आहे. गेल्या वर्षी सुवर्णा मुजुमदार या महिलेच्या गळ्याभोवती मांजा अडकल्याने त्यांनी आपला जीव गमावला. अशा मांजाची निर्मिती, विक्री, साठवण, खरेदी व वापर यावर कायद्याने बंदी आहे. चीनी मांजा सापडल्यास संबंधितांवर पाच वर्षांचा तुरुंगवास व एक लाखाच्या आर्थिक दंडाची तरतूद आहे; मात्र शासकीय यंत्रणेच्या ढिलेपणामुळे हा मांजा बाजारात विकला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने याआधी घटलेल्या दुर्घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन चीनी मांजा विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी. तसेच, राष्ट्रीय हरित लवादाने याप्रकरणी लक्ष घालावे.’

‘या मांजाला अनेक पक्षीही बळी पडतात. यामध्ये कबुतरे, कावळे, घुबड, पोपट, घार आणि फुलपाखरे यांचा समावेश आहे. जखमी पक्ष्यांच्या बचावासाठी सर्वजीव मंगल प्रतिष्ठान गेल्या १५ वर्षांपासून काम करीत आहे. गेल्या चार-पाच वर्षांत जवळपास १५० पक्ष्यांना वाचविण्यात यश आले आहे. यंदाही एक अ‍ॅम्ब्युलन्स, एक पशुवैद्यकीय डॉक्टर आणि चार-पाच कार्यकर्ते ही बचावकार्य मोहीम राबविणार आहेत. त्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे,’ असे डॉ. गंगवाल यांनी सांगितले.

जखमी पक्ष्यांची माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक :
डॉ. कल्याण गंगवाल :
९८२३० १७३४३,
सुनील परदेशी : ९८२३२ ०९१८४,
अनिल अवचिते :
९४२२३ ४९७८९
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search