Next
आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त कार्यक्रम
प्रेस रिलीज
Wednesday, May 23, 2018 | 02:43 PM
15 0 0
Share this article:पुणे : आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सोसायटी फॉर एन्व्हायरन्मेंट अँड बायोडायव्हर्सिटी कंझर्व्हेशन (एसईबीसी) ही जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करणारी स्वयंसेवी संस्था व दी हिमालया ड्रग कंपनी या भारताच्या आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्या अग्रगण्य कंपनीच्या संयुक्त विद्यमाने शहरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पर्यावरणाचे संवर्धन व जैवविविधतेचे महत्त्व यावर भर देण्यात आला.

या कार्यक्रमाची संकल्पना होती ‘जैवविविधेचे संरक्षण– समृद्ध पश्चिम घाट’ कार्यक्रमामध्ये नामवंत पर्यावरणवादी, वन विभागाचे अधिकारी, शिक्षणतज्ञ, कॉलेजचे विद्यार्थी व शहरातील निसर्गप्रेमी असे मिळून ४०० हून अधिक व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात परंपरागत झाडांच्या फेरफटक्याने झाली, त्यानंतर पश्चिम घाट, औषधी वनस्पती व खाण्यायोग्य रानटी फळे या विषयांवरील छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश सोनुने व ज्येष्ठ अधिकारी रमाकांत बोरहाडे, वन विभागाचे अभियंता रिसर्च विंग, वन विभाग यांच्या हस्ते झाले.

दी हिमालया ड्रग कंपनीच्या वनस्पती रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बाबू म्हणाले, ‘एसईबीसी व दी हिमालया ड्रग यांनी दोन वर्षांपूर्वी निसर्गातील जैवविविधेची भूमिका व अधिक सुरक्षित व हरित पर्यावरणाचे महत्त्व याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या मंचाची निर्मिती केली. नाविन्यपूर्ण उपाययोजनांवर विचार करण्यासाठी व जंगलतोड व त्याचा निसर्गावरील परिणाम यासारख्या पर्यावरणविषयक समस्यांवर चर्चा करण्यासाठी विविध क्षेत्रातील संबंधित भागधारकांना आमंत्रित करण्यात आले होते. पश्चिम घाट हा भारतातील जैवविविधतेचा खजिना आहे व इथे मिळणाऱ्या वनस्पतींचा अनेक वर्षांपासून औषधांमध्ये वापर केला जातोय. आयुर्वेद, सिद्ध, युनानी व होमिओपथी यांसारख्या पारंपरिक औषधांमध्ये चार हजार ५०० हून अधिक वनस्पती वापरल्या जातात अशी नोंद आहे; मात्र ज्या झपाट्याने जंगलतोड सुरू आहे. त्यामुळे भारतात जवळपास १.५ दशलक्ष हेक्टरचे जंगल नष्ट होत चालले आहे.’

‘पृथ्वीची काळजी घेण्यासाठी बांधील असलेली दी हिमालय ड्रग कंपनी, आता दशकभराहून अधिक काळापासून निसर्गाच्या संवर्धनासाठी काम करतेय. संघटनेद्वारे सुरू करण्यात आलेल्यांपैकी एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे पश्चिम घाटामध्ये वनीकरण, ज्यामध्ये स्थानिक समुदाय, हिमालया व एसईबीसी यांनी एकत्रितपणे सहा लाखांहून अधिक झाडांची लागवड केली आहे. यामुळे या समुदायांना गुरांसाठी अन्न व चारा उपलब्ध झाला आहे. जमिनीचा पोत सुधारला आहे व अशाप्रकारे प्रत्येक झाडाद्वारे दरवर्षी ५० पौंड कार्बन डायऑक्साईड शोषला जातो. आमचा रोप जैवतंत्रज्ञान संशोधन गट नामशेष होऊ लागलेल्या व दुर्मिळ झाडांचे उती संवर्धन करून रोपे तयार करतो, म्हणजे भविष्यात अशा प्रजातींची लागवड करायला प्रोत्साहन दिले जाते व ती नामशेष होऊ दिली जात नाही. अशाप्रकारे, आम्ही निसर्गात संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचे व्यापक उद्दिष्ट समुदायांना निसर्गाचे महत्त्व, त्यातील घटक समजून घेण्यासाठी व स्वतःच्या भल्यासाठी त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रशिक्षण देणे व समर्थ करणे हे आहे,’ असेही डॉ. बाबू यांनी सांगितले.

‘एसईबीसी’चे उपाध्यक्ष डॉ. श्रीनाथ कवडे म्हणाले, ‘भारत हे जागतिक पातळीवरील ११वे सर्वात मोठे जैवविविधता केंद्र आहे, त्यामध्ये ईशान्य भारत, पश्चिम घाट, अंदमान व निकोबार बेटे यांचा समावेश होतो. मानवी वसाहतींमध्ये वाढ झाल्याने निसर्गचक्रात जे बदल झाले आहेत. त्यामुळे आज जैवविविधतेवर मोठ्या प्रमाणावर फरक पडला आहे. जगात आज, निसर्गातील संतुलन राखून ठेवण्यासाठी नामशेष होत चाललेल्या व दुर्मिळ वनस्पती व त्यांची ठिकाणे सुरक्षित ठेवण्याची नितांत गरज आहे.’

कार्यक्रमाची सांगता जैवविविधतेच्या खजिन्याची शोध या कार्यक्रमाने झाली. त्यानंतर शाश्वत विकासावरती एक लघुपट दाखविण्यात आला. चर्चेच्या प्रमुख सत्रांमध्ये जमिनीचा कस खालावणे, दुष्काळ, पाणी व स्वच्छता, आरोग्य व शाश्वत विकास या सर्व क्षेत्रातील जैवविविधतेचे महत्त्व व देशात या संदर्भात झालेली प्रगती यावर प्रामुख्याने भर देण्यात आला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search