Next
ठाण्यात २२ ऑगस्टला होणार १०० महिलांचा गौरव
BOI
Tuesday, August 20, 2019 | 12:47 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : समान संधींचा लढा सुरू केल्यावर महिलांनी आपल्या सर्वांगीण विकासाचा निर्धार केला. आज त्यांच्यापैकी अनेक जणी उत्कर्षाच्या शिखरावर पोहोचल्या आहेत. अशाच १०० कर्तृत्ववान महिलांना ठाण्यात २२ ऑगस्ट रोजी ‘वुमन सबस्टन्स’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महिलांना पुरस्कार दिले जाणार आहेत. कलानिधी आणि ठाणेवैभव यांच्यातर्फे हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. ‘कलानिधी’चे अमित काडिया, ‘ठाणेवैभव’चे निखिल बल्लाळ आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या परिशा सरनाईक पत्रकार परिषदेला उपस्थित होते. ठाणेवैभव हे नियतकालिक गेली ४५ वर्षे प्रसिद्ध होत असून, कलानिधी ही आर्थिक विषयात काम करणारी संस्था आहे. गडकरी रंगायतन येथे २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच ते सातदरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आणि ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल या वेळी उपस्थित राहणार आहेत. निरनिराळ्या पारंपरिक साड्या परिधान करून महिला रॅम्प वॉकही करणार आहेत, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.

‘खडतर मार्गाने गेलेल्या आणि असंख्य आव्हाने पेलून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांना ‘ठाणेवैभव’ने शोधून काढले. ‘कलानिधी’ने या उपक्रमाला साह्य केले. या अभिनव उपक्रमाची सांगता करताना त्यास सामाजिक बांधिलकीची जोड देण्यात येणार आहे. कर्करोगाविषयी काम करणाऱ्या नगरसेविका परिशा सरनाईक यांच्या संस्थेला मदत केली जाणार आहे,’ अशी माहिती या वेळी देण्यात आली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search