Next
‘सह्याद्री हॉस्पिटल्स’तर्फे बालकांवर हृदय शस्त्रक्रिया
प्रेस रिलीज
Monday, July 02, 2018 | 01:58 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंर्तगत येथील सह्याद्री हॉस्पिटल्सतर्फे पाचशे बालकांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचा टप्पा नुकताच पार केला. एप्रिल २०१४मध्ये सह्याद्री हॉस्पिटल्सने या योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया करणे सुरू केले. अवघ्या चार वर्षांमध्येच चार हजार हृदय शस्त्रक्रिया आणि ५०० बालकांच्या ह्रदयाच्या शस्त्रक्रिया तसेच ५०० पेडियाट्रिक कार्डियाक इंटरव्हेंशन्स (उपकरणांद्वारे हृदयामधील छिद्र बुजविण्याची प्रक्रिया) केल्या आहेत,’ अशी माहिती डेक्कन जिमखाना येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. केतन आपटे यांनी दिली.

आपल्या क्षमतेच्या परिसीमा ओलांडत रुग्णांवर उपचार करणे, त्यांना गुंतागुंतीच्या जोखीमेतून बाहेर काढणे व त्यांना लवकर बरे करणे यासाठी सह्याद्री हॉस्पिटल्स प्रयत्नशील आहे. या विषयी माहिती देण्यासाठी सह्याद्री हॉस्पिटल्समधील बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. पंकज सुगांवकर, भूलतज्ज्ञ डॉ. शंतनू शास्त्री, सल्लागार कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. राजेश कौशिश आणि डॉ. महेंद्र बाफना आदी उपस्थित होते.

सह्याद्री हॉस्पिटल्सचे बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. पंकज सुगांवकर म्हणाले, ‘गरजू रुग्णांपर्यंत पोहचण्यासाठी आम्ही पुण्याबाहेरही नियमितपणे तपासणी शिबिरे घेत असतो. विशेषतः मराठवाड्यात. आम्ही दिवसाला २०० रुग्णांना तपासतो आणि १५० एको प्रक्रिया करतो. तपासणी झाल्यानंतर आम्ही सह्याद्री हॉस्पिटल्स येथे गरजू रुग्णांना त्यांच्या कागदपत्रांबद्दल मार्गदर्शन करतो. एकदा आम्ही आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे तपासल्यावर या शस्त्रक्रिया विनामूल्य केल्या जातात.’

‘सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एक ते १५ जुलै २०१८ दरम्यान मोफत हृदय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरादरम्यान बालरोग हृदयतज्ञांद्वारे मोफत सल्ला दिला जाईल,’ असे डॉ. आपटे यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search