Next
जावेद शेख यांना ‘आयटी एक्स्पर्ट अ‍ॅवॉर्ड’
प्रेस रिलीज
Friday, January 12 | 12:34 PM
15 0 0
Share this story

पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या ‘पै आयसीटी अ‍ॅकॅडमी’तर्फे राज्यस्तरीय आंतरशालेय ‘डॉ. पी. ए. इनामदार आयटी एक्स्पर्ट अ‍ॅवॉर्ड’ स्पर्धा नुकतीच आयोजित केली होती. यात हडपसर येथील शामसुद्दीन इनामदार उर्दू स्कूलचे संगणक प्रशिक्षक जावेद शेख यांनी विजेतेपदाचा मान पटकाविला आहे.

स्पर्धेचे ११वे वर्ष होते. ही स्पर्धा आझम कँपसमधील डॉ. ए. आर. शेख असेंब्ली हॉल येथे झाली. या स्पर्धेला कुडची येथील जुवेदी स्कूलचे इक्बाल सत्तार आणि पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष नुरूद्दीन सोमजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ‘एमसीई’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी भूषवले. या वेळी पै आयसीटी अ‍ॅकॅडमीच्या संचालक मुमताझ सय्यद, अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापक आयेशा शेख, अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य परवीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

ही स्पर्धा पाच प्रकारांमध्ये झाली. यामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा, हार्डवेयर स्पर्धा, काँप्युटरटर टायपिंग, मुव्ही मेकिंग स्पर्धा, संगणक प्रशिक्षकांसाठी ऑनलाइन परीक्षा या स्पर्धांचा समावेश होता. प्रश्नमंजुषा स्पर्धेत पहिली ते चौथी या गटात आठ हजार ६६१ विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील दोन विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देण्यात आले.

हार्डवेयर स्पर्धेत पाचवी ते सातवीतील आठ हजार ६१५ विद्यार्थी सहभागी झाले. पहिल्या दोन विजेत्यांना ‘हार्डवेअर टूल किट’, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले. काँप्युटर टायपिंग (उर्दू, इंग्लिश आणि मराठी) आठवीतील तीन हजार २६१ विद्यार्थी सहभागी झाले. प्रथम दोन विजेत्यांना संगणक संच, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले. मुव्ही मेकिंग स्पर्धेत नववी-दहावीतील चार हजार २८६ विद्यार्थी सहभागी झाले. प्रथम दोन विजेत्यांना कॅमेरा, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

संगणक प्रशिक्षकांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. यामध्ये ८१ संगणक प्रशिक्षक सहभागी झाले होते. प्रथम विजेत्यास ‘डॉ. पी. ए. इनामदार आयटी एक्स्पर्ट अॅवॉर्ड’, १० हजार रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

‘उर्दू माध्यम, इंग्रजी माध्यम शाळा, पुणे महापालिका शाळा, तसेच पुण्याबाहेरील १०६ शाळा ‘पी. ए. इनामदार संगणक केंद्रा’शी संल्गन आहेत,’ अशी माहिती मुमताझ सय्यद यांनी प्रास्ताविकात दिली. पै आयसीटी अ‍ॅकॅडमीचे समन्वयक अरीफ सय्यद यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link