Next
मेस्त्री यांना ‘प्रकाशाचे बेट’ पुरस्कार
BOI
Wednesday, December 06 | 03:55 PM
15 0 0
Share this story

प्रेमसागर मेस्त्री यांचा गौरव करताना डॉ. विनिता आपटेपुणे : ‘पर्यावरणासाठी कार्यरत असलेल्या आणि प्रसिद्धीपासून दूर असलेल्या संस्था आणि व्यक्तींना तेर पॉलिसी सेंटर या संस्थेकडून प्रत्येक महिन्यात ‘प्रकाशाचे बेट’ पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. नोव्हेंबरमधील हा पुरस्कार महाड (जि. रायगड) येथील प्रेमसागर मेस्त्री यांना प्रदान करण्यात आला,’ अशी माहिती ‘तेर’च्या अध्यक्षा डॉ. विनिता आपटे यांनी दिली.

तेर पॉलिसी सेंटर ही पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी नामांकित संस्था असून, पर्यावरण क्षेत्रात विविध पातळ्यांवर कल्पक प्रकल्पांची अंमलबजावणी करणारी संस्था असा नावलौकिक असलेली संस्था आहे. निसर्गावर प्रेम करणाऱ्या कित्येक संस्था व माणसं विविध उपक्रम राबवत असतात; परंतु त्यांच्या कामाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचत नाही. अशा धडपडणाऱ्या गुणी लोकांचा पुरस्कार देऊन ‘तेर’कडून गौरव केला जातो. प्रत्येक महिन्याला एका व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो.

निसर्गचक्रात गिधाडाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे; परंतु आजच्या काळात गिधाडांची संख्या हळूहळू नष्ट होत असल्यामुळे त्यांच्या संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. प्रेमसागर मेस्त्री हे गिधाड संरक्षणाचा वसा हाती घेतलेले कार्यकर्ते आहेत. गिधाडाच्या अधिवासाच्या जागा शोधण्यापासून ते व्हल्चर रेस्टॉरंट उघडून गिधाडांना स्वत:च्या पैशाने खायला घालून त्यांचा सांभाळ करण्याचे कार्य ते गेली अनेक वर्ष करत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना ‘तेर’कडून ‘प्रकाशाचे बेट’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

‘तेर’च्या संस्थापक अध्यक्ष डॉ. विनिता आपटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ‘तेर’च्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मेस्त्री यांनी उपस्थितांना छायाचित्र व चित्रफीत दाखवत त्यांचे अनुभव सांगितले. मेस्त्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी गिधाडाच्या अभ्यासाला केलेली सुरुवात, विविध गावे व वस्त्यांना दिलेल्या भेटी, लोकांमध्ये गिधाडांविषयीची जागरूकता, गावकऱ्यांकडून आलेले अनुभव, काही नैसर्गिक अडथळे आणि त्यावर मात करून यशस्वीरीत्या सोडवलेले गिधाडांचे प्रश्न अशा सर्व गोष्टींचे अनुभवकथन मेस्त्री यांनी केले. आजवर जवळपास २५२ गिधाडांचे संवर्धन मेस्त्री यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ashwini Satav About
dear Dr.Vinita madam really great work u have done for society.my best wishes to u and u r Terr center
0
0
Bela Walia About
Great job and way of inspiring people for conserving nature by giving awards
0
0
Sanjay Tokekar About
Congratulations to Mr. Premsagar Mistry for doing this wonderful work on environmental ecological balance. Also wishing best wishes to Terr Policy Centre Dr. Vinita Apte for giving this recognition to those youths who are working behind the screens without any expectations. Such boost given Terr Policy Center will definitely create an enthusiasm amongst people who are working for environment. All the very best wishes at all times.
0
0

Select Language
Share Link