Next
दगडे यांना कृतिशील शिक्षक पुरस्कार जाहीर
BOI
Saturday, April 28, 2018 | 12:31 PM
15 0 0
Share this story

हनुमंत दगडेसोलापूर : आष्टी (ता. मोहोळ) येथील नूतन विद्यालयाचे सहशिक्षक हनुमंत श्रीरंग दगडे यांना आमदार दत्तात्रय सावंत यांच्या महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचा कृतिशील शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.  

या पुरस्काराचे वितरण पाच मे रोजी पंढरपूर येथे गृहराज्य मंत्री रणजीत पाटील व शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. दगडे हे मुळचे ढेकळेवाडी (बैरागवाडी) येथील असून, ते आष्टी येथील ऐलक पन्न्लाल दिगंबर जैन पाठशाळा संचलित नूतन विद्यालयात सहशिक्षक म्हणून काम करीत आहेत. गणित हा त्यांचा मुख्य विषय आहे. त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

यापूर्वी त्यांना २०१४साली सोलापूर जिल्हा गणित संघटनेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार, भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठानतर्फे २०१७साली सेवाभावी शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. नुकतेच त्यांना मरवडे (ता. मंगळवेढा) येथील छत्रपती शिवाजी सांस्कृतिक व क्रीडा मंडळातर्फे कृतीनिष्ठ शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

दगडे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच ऐश्वर्या पाटील, उपसरपंच वसुदेव व्यवहारे, ढेकळेवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अरुण लोखंडे, मुख्याध्यापक सतीश कांबोज व शिक्षक कर्मचारी व स्थानिक शाळा समितीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. ‘या पुरस्कारांमुळे मला सेवानिवृत्तीच्या अखेरच्या दिवसापर्यंत अखंड कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळाली,’ अशी प्रतिक्रिया दगडे यांनी व्यक्त केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link