Next
ससून अभ्यागत मंडळ बैठक
प्रेस रिलीज
Thursday, January 11 | 10:55 AM
15 0 0
Share this story


पुणे : खासदार अनिल शिरोळे यांनी ससूनच्या सिम्युलेशन विभागासाठी खासदार निधीतून सव्वादोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ससून अभ्यागत मंडळाच्या बैठकीनंतर बोलताना मंडळाचे अध्यक्ष खासदार अनिल शिरोळे यांनी ही माहिती दिली. 

‘ससून कायम स्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा उभारावी लागणार आहे. या यंत्रणेसाठी आवश्यक तो निधी जनता, लोकप्रतिनिधी आणि सरकार यांच्या मदतीने उभा करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे,’ असे शिरोळे यांनी सांगितले. 

‘ससूनमधील निवासी वसतिगृहाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सहकार्य करणे आवश्यक आहे. त्यासाठी एक सर्वंकष अहवाल तयार करून, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील ह्यांच्याशी विस्तृत चर्चा करणार असल्याचे,’ शिरोळे म्हणाले. ससूनमध्ये अनधिकृत प्रवेश करणाऱ्या, तसेच अस्वच्छता करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश, शिरोळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या वेळी दिले.

या बैठकीला आमदार जगदीश मुळीक, आमदार विजय काळे, नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, अभ्यागत मंडळाचे संभाजी पाटील, बागेश्री मंथाळकर  आणि ससूनमधील संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link