Next
पर्यावरणदिनी पेट्रोल पंपाच्या मालकाने केले ५०० रोपांचे वाटप
BOI
Thursday, June 06, 2019 | 05:54 PM
15 0 0
Share this article:



रत्नागिरी :
जागतिक पर्यावरण दिनी (पाच जून) रत्नागिरीतील उद्योजक कॅ. कोमल सिंग यांनी त्यांच्या अद्वैत पेट्रोल पंपावर आलेल्या ५०० ग्राहकांना एक झाड भेट दिले. ‘दर वर्षी मी एक झाड लावून ते जगवीन,’ अशी प्रतिज्ञा ग्राहकांकडून लिहून देऊन त्याखाली त्यांची स्वाक्षरीसुद्धा घेतली. गेली काही वर्षे ते हा विधायक उपक्रम राबवत असून, रत्नागिरीकरांकडून त्यांचे कौतुक होत आहे.



माळनाका परिसरात कॅ. कोमल सिंग यांचा पेट्रोल पंप आहे. त्यांचे समाजाभिमुख अनेक उपक्रम आहेत. देशी गायीचे संवर्धन करण्यासह सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असतो. दर वर्षीप्रमाणे त्यांनी यंदाही पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५०० ग्राहकांना रोपे दिली. त्यात देशी प्रजातीच्या रोपांचा समावेश होता. पेट्रोल, डिझेल भरायला आलेल्या ग्राहकांना हा सुखद धक्का होता.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Jaiprakash Babau Singh About 100 Days ago
Good job
0
0

Select Language
Share Link
 
Search