Next
‘महिंद्रा’ची नवी ‘अल्तुरास’ लवकरच होणार दाखल
प्रेस रिलीज
Tuesday, November 06, 2018 | 02:56 PM
15 0 0
Share this story

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (एमअँडएम) कंपनीने आपल्या हाय-एंड एसयूव्हीचे अल्तुरास जी-फोर (Alturas G4) असे नामकरण केले असून, ती २४ नोव्हेंबर २०१८ रोजी दाखल केली जाणार आहे.  

याविषयी बोलताना ‘एमअँडएम’चे सेल्स व मार्केटिंग प्रमुख विजय नाकरा म्हणाले, ‘अल्तुरास याचा अर्थ ‘उंची’ किंवा ‘शिखर’. आयुष्यामध्ये यशाचे शिखर गाठलेल्या व्यक्तींना लक्झरीमध्ये प्रवेश करण्याच्या द्वाराचे प्रतिनिधित्व अल्तुरास जी-फोर करते. हे वाहन अतिशय लक्झरिअस असल्याने, त्याचे डिझाइन व निर्मिती उत्कृष्ट असल्याने, त्याचे ‘अल्तुरास जी-फोर’ हे नाव या वाहनाची वैशिष्ट्ये अचूकपणे स्पष्ट करते, असे आम्हाला वाटते.’

हाय एंड एसयूव्ही सेग्मेंटमध्ये समाविष्ट असलेली अल्तुरास जी-फोर ३० लाखांहून अधिक किंमत असणाऱ्या वाहनांशी स्पर्धा करणार आहे. या गाडीमध्ये आकर्षक डिझाइन व लक्झरिअस अंतर्भागात लक्झरी व वैशिष्ट्यपूर्णतांचा समावेश आहे. उल्लेखनीय कामगिरी व ऑफ-रोड क्षमता, अतिशय सुरक्षितता ही या गाडीची वैशिष्ट्ये आहेत.

‘अल्तुरास’ची निर्मिती पुण्यातील चाकण येथील कंपनीच्या उत्पादन प्रकल्पामध्ये केली जाणार असून, ती २४ नोव्हेंबर २०१८ रोजी दाखल केली जाणार आहे. या गाडीच्या डीलरशिपसाठी पाच नोव्हेंबरपासून प्री-बुकिंग सुरू झाले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link