Next
इंग्रजी साहित्यिक अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
BOI
Friday, December 14 | 05:34 PM
15 0 0
Share this story

अमिताभ घोषनवी दिल्ली : इंग्रजी साहित्यातील नामवंत लेखक म्हणून गणले जाणारे प्रसिद्ध लेखक अमिताव घोष यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. येथील ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत ५४व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी एकमताने अमिताव घोष यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 

११ जुलै १९५६मध्ये कोलकाता येथे घोष यांचा जन्म झाला. भारत, बांग्लादेश आणि श्रीलंका अशा तीन देशांत ते लहानाचे मोठे झाले. दिल्ली, ऑक्स्फर्ड आणि अलेक्झांड्रिया याठिकाणी त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांची ‘दी सर्कल ऑफ रीजन’ आणि ‘शॅडो लाइन्स’ ही दोन पुस्तके खूप लोकप्रिय झाली. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. विशेष म्हणजे ‘शॅडो लाइन्स’ या पुस्तकाला मानाचा साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला आहे. याशिवाय ‘फ्रॅंकफर्ट बुक फेअर’चा ‘आंतरराष्ट्रीय ई-बुक पुरस्कार’, प्रसिद्ध भारतीय ‘क्रॉसवर्ड पुरस्कार’, ‘इंडिया प्लाझा गोल्डन क्विल पुरस्कार’, भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानित करण्यात आले आहे.    

अमिताव घोष यांचे साहित्य २०पेक्षा अधिक भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आले आहे. बराच काळ इंग्रजी पत्रकारितेत कार्य केलेल्या घोष यांचे अनेक निबंध ‘दी न्यूयॉर्कर’, ‘दी न्यू रिपब्लिक’ आणि ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’मधून प्रकाशित झाले आहेत.   
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link