Next
अॅमेझॉनचे देशातील सर्वांत मोठे डिलिव्हरी स्टेशन पुण्यात
तब्बल चाळीस हजार चौरस फूट क्षेत्रावर उभारणी
BOI
Saturday, August 31, 2019 | 04:30 PM
15 0 0
Share this article:

पुण्यात उभारण्यात आलेल्‍या अॅमेझॉनच्या देशातील सर्वांत मोठ्या डिलिव्हरी स्टेशनच्या उद्घाटनप्रसंगी लास्‍ट माइल ट्रान्‍सपोर्टेशनचे संचालक प्रकाश रोचलानी, पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे उपस्थित होते.

पुणे : अॅमेझॉन या ऑनलाइन सेवापुरवठादार कंपनीने भारतातील आपले सर्वांत मोठे डिलिव्हरी स्टेशन पुण्यामध्ये उभारले असून, तब्बल चाळीस हजार चौरस फूट क्षेत्रावर हे केंद्र उभारण्यात आले आहे. नुकतेच त्याचे उद्घाटन अॅमेझॉन इंडियाच्या लास्ट माइल ट्रान्सपोर्टेशनचे संचालक प्रकाश रोचलानी यांच्या हस्ते झाले. या वेळी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयामधील विभाग-दोनचे पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे उपस्थित होते.  

कंपनीने महाराष्ट्रातील तुळजापूर, लोणार, कोलाड, शेगाव, इगतपुरी, संगमेश्वर व शिराळा यांसारखी शहरे व नगरांमधील डिलिव्हरी नेटवर्कच्या विस्तारीकरणाचीदेखील घोषणा केली आहे. महाराष्ट्रात अॅमेझॉनचे ६० हजारांहून अधिक विक्रेते असून, १४ फुलफिलमेंट केंद्रे आहेत. 

या विस्तारीकरणाबाबत बोलताना प्रकाश रोचलानी म्हणाले, ‘४० हजार चौरस फूट जागेवर पसरलेल्या नवीन मोठ्या डिलिव्हरी स्टेशनमुळे आणि नेटवर्कच्या विस्तारीकरणामुळे छोट्या खेड्यांमधील ग्राहकांनादेखील एका दिवसात वस्तू घरपोच मिळण्याच्या सेवेचा अनुभव घेता येणार आहे. हवी ती वस्तू उपलब्ध होण्याची शक्यता वाढणार आहे; तसेच यामुळे हजारो रोजगार संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा व तंत्रज्ञानामध्ये आमची दीर्घकालीन गुंतवणुकीप्रति असलेली कटिबद्धता कायम ठेवू.’

‘या विस्तारीकरणासह अॅमेझॉनचे राज्यभरात जवळपास २०० मालकीची आणि डिलिव्हरी सर्व्हिस पार्टनर स्टेशन्स आहेत. तीन हजारांहून अधिक ‘आय हॅव स्पेस’ पार्टनर्स बनले आहेत. या विस्तारीकरणामुळे महाराष्ट्रातील जवळपास ९०० पिनकोड्सवर अॅमेझॉनकडून डिलिव्हरी देता येऊ शकेल,’ असेही रोचलानी यांनी स्पष्ट केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vishal About 19 Days ago
Wanted franchise in pune rural areas
0
0

Select Language
Share Link
 
Search