Next
मत्स्याहारी, मांसाहारी पदार्थांची स्पर्धा
प्रेस रिलीज
Friday, July 21, 2017 | 05:22 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : विरारच्या ‘यंग स्टार्स ट्रस्ट’चे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर व नालासोपारा येथील गेट टुगेदर ग्रुप यांच्या वतीने मत्स्याहारी-मांसाहारी पदार्थांची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेत कोणत्याही जाती धर्माचे स्त्री-पुरुष सहभागी होऊ शकतात. यात स्पर्धक एक किंवा एकापेक्षा जास्त पदार्थ सादर करू शकतात. स्पर्धेसाठी सादर करण्यात येणारा पदार्थ फक्त अंडी, मासे, कोंबडी अथवा बोकडाचे मटण यापासूनच बनविलेला असावा. या स्पर्धेसाठी स्पर्धकाने कोणत्याही स्वरूपाचा एखादा पदार्थ किंवा पूर्ण ताट घरी बनवून आणून सादर करावयाचे आहे. पदार्थ कसा बनविला, कोणते साहित्य वापरले ते सोबत लिहून आणावे लागेल, असे आयोजकांनी कळवले आहे.
अंतिम निर्णय परीक्षकांचा असेल. यातील विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धा झाल्यानंतर स्पर्धक त्यांनी आणलेल्या पदार्थांची उपस्थितांना थेट विक्री करू शकतात. स्पर्धेत विनामूल्य प्रवेश घेता येईल. आतापर्यंत २००हून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केली आहे.

स्पर्धेविषयी :
दिवस : रविवार, २३ जुलै २०१७
वेळ : सायंकाळी चार वाजता
स्थळ : बहुजन विकास आघाडी भवन, चौथा रस्ता, नालासोपारा (पश्चिम), मुंबई

नावे नोंदविण्यासाठी संपर्क :
नरेश जाधव : ९३२३५ १५६७०
शांताराम वाळिंजकर : ९८५०६ ७४०२७
सीमा पाटील : ९८६०७ ६०७५३
राजेश रोडे : ९८९०७ ४४०४३
सुनील शेवाळे : ९८६०८ ०५३६३

अधिक माहितीसाठी :
समन्वयक अजीव पाटील : ९८२३१ ४६३७३
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search