Next
‘होंडा’तर्फे डिओची २०१८ आवृत्ती सादर
प्रेस रिलीज
Wednesday, May 16, 2018 | 04:13 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने सर्व वितरकांकडे २०१८ डिओ उपलब्ध करत असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. ग्राहकांना अधिक मूल्य देण्यासाठी डिओ आता नव्या डिलक्स प्रकारातही उपलब्ध करण्यात आली आहे.

‘होंडा’ची एलईडी वैशिष्ट्ये आता डिओमध्ये समाविष्ट करण्यात आले असून मोटो स्कूटरच्या बोल्ड फ्रंट प्रतिमेला साजेसे नवे एलईडी हेडलॅंप्स आणि पोझिशन लॅंप बसवण्यात आले आहेत. त्याशिवाय सीट उघडणाऱ्या स्विचसह फोर इन वन लॉक, आत ओढता येण्यासारखा रिअर हूक ही वैशिष्ट्येही समाविष्ट करण्यात आली आहेत. या मोटो- स्कूटरला आता मेटल मफलर प्रोटेक्टरही बसवण्यात आला आहे. डिलक्स प्रकारामध्ये अधिक चांगल्या सफरीसाठी नेहमीच्या वैशिष्ट्यांसह नवे डिजीटल मीटर (थ्री स्टेप इको स्पीड इंडिकेटर आणि सर्व्हिस ड्यू इंडिकेटरसह) देण्याच आले आहे. गाडीच्या प्रीमियम लूकमध्ये भर घालण्यासाठी दर्जेदार सिग्नेचर सोनेरी रिम आणि आकर्षक रंगांचे पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत.

२०१८ डिओ उपलब्ध करण्याविषयी ‘होंडा’च्या विक्री आणि विपणनचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘डिओचा १५ वर्षांची वारसा पुढे नेण्यासाठी २०१८ची आवृत्ती दोन प्रकारांत उपलब्ध करण्यात आली आहे. गाडीचा हा लूक आतापर्यंतचा सर्वात आकर्षक आणि तरुण आहे. स्टायलिश नव्या लूकसह नवे डिजीटल मीटर थ्री स्टेप इको स्पीड इंडिकेटर आणि सर्व्हिस ड्यू इंडिकेटरची सुविधा असलेली डिओ मापदंड उंचावणारी आहे. डिओ ही भारतातून सर्वाधिक प्रमाणात निर्यात होणारी स्कूटर असून, तिने आतापर्यंत पाच लाख निर्यातीचा टप्पा गाठला आहे. तुम्ही नवा मार्ग  अवलंबत असाल, तर नवे जग तुमचेच आहे.’ 

डिओला ‘होंडा’चे बलशाली ११० सीसी एचईटी (होंडा इको टेक्नॉलॉजी) इंजिन बसवले असून, त्यात मायलेज आणि ताकद यांचा योग्य समतोल राखण्यात आला आहे. हे इंजिन अधिक चांगले कम्ब्युशन देणारे, कमी खरखर करणारे, थंड होण्याची क्षमता जास्त चांगली क्षमता असलेले आहे. यामुळे गाडीची कामगिरीही उंचावते. ग्राहकांना कुठेही त्यांचा स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी पर्यायी मोबाइल सॉकेटही मिळू शकते.

डिओला इक्विलायझर तंत्रज्ञानासह कॉम्बी ब्रेक सिस्टीम (सीबीएस) बसवण्यात आली आहे. ‘होंडा’च्या आधुनिक कॉम्बी ब्रेक सिस्टीममधील (सीबीएस) हा अभिनव इक्विलायझर गाडीच्या पुढील आणि मागील चाकांमध्ये ब्रेकिंग फोर्सचे समांतर वितरण करतो. यामुळे ब्रेकिंग अंतर कमी होते आणि नेहमीच्या ब्रेकिंग यंत्रणेच्या तुलनेत अधिक सुधारित समतोल मिळतो.

२०१८ डिओ ही आता नऊ आकर्षक रंग आणि स्टँडर्ड व डिलक्स या दोन प्रकारांत उपलब्ध करण्यात आली आहे. स्टँडर्ड प्रकारात ट्रिम व्हायब्रंट ऑरेंज, पर्ल स्पोर्ट्स यलो, स्पोर्ट्स रेड, कँडी जॅझी ब्लू, मॅट अक्सिस ग्रे मेटॅलिक हे रंग उपलब्ध आहे. डिलक्स प्रकारात डॅझल यलो मेटॅलिक, मॅट मार्शल ग्रीन मेटॅलिक, पर्ल इग्नियस ब्लॅक, मॅट अक्सिस ग्रे मेटॅलिक या रंगात उपलब्ध करण्यात आला आहे. २०१८ डिओची सुरुवातीची किंमत ५१ हजार २९२ रुपये (एक्स शोरूम दिल्ली) आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link