Next
पुण्यात अखिल भारतीय व्हिडिओ फोटो प्रदर्शन
प्रेस रिलीज
Tuesday, October 23, 2018 | 11:49 AM
15 0 0
Share this article:

पुणे : कॅवॉक सर्व्हिसेसतर्फे ‘पुणे फोटो फेयर २०१८’ या पाचव्या आखिल भारतीय व्हिडिओ फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सकाळी ११ ते ७ या वेळेत हे प्रदर्शन भरेल.

‘छायाचित्र आणि छायाचित्रण या विषयाशी निगडीत या प्रदर्शनामध्ये पुणे, मुंबईबरोबरच महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सोलापूर, बार्शी, नाशिक, तसेच गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, चेन्नई, बंगळूरू, केरळ आदी ठिकाणचे छायाचित्रकार, तसेच छायाचित्रण क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी होणार आहेत; या प्रदर्शनाला महाराष्ट्रातील छायाचित्रकार संघांचा सहभाग आणि पाठिंबा आहे,’ अशी माहिती पुणे फोटो फेयरचे अनिल जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

या वेळी फोटोग्राफर्स फाउंडेशन ऑफ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष प्रशांत पासलकर, पुणे फोटो व्हिडिओ असोसिएशनचे अभय कापरे, चाकण फोटोग्राफर्स असोसिएशनचे दिलीप आगरकर, पुणे फोटोग्राफिक सोसायटीचे जीतु कोपर्डे व राजेश वाजे आदी मान्यवर उपस्थित होते.

देशी विदेशी ७०हून अधिक कंपन्यांची फोटोग्राफी व  छायाचित्रणविषयीची सर्व साहित्यसामुग्री या प्रदर्शनामध्ये पहायला मिळणार आहे. कॅमेरा विभागात सोनी, निकॉन, कॅनॉन, पॅनासॉनिक आदी कंपनीचे कॅमेरे, प्रिंटिंग विभागात कोनिका. मिनॉलटा, एप्सन, एचपी, कॅननचे प्रिंटर्स, फोटो अल्बम विभागात विषयानुरूप गाणी असलेले, कुटुंबातील सदस्यांची नावे वापरून खास तयार करून घेतलेल्या गाण्यांचा समावेश असलेले अल्बम्स (वेडिंग ऑडिओ अल्बम्स) असणार आहेत.

कॅननचे दोन प्रकारचे मिररलेस कॅमेरे पुणे फोटो फेअरमध्ये सादर करण्यात येणार आहेत. फोटो व व्हिडिओ कॅमेरा, फोटो एडिटिंगचे सॉफ्टवेअर व हार्डवेअर, इंस्टंट फोटो प्रिंटर, व्हिडिओ मिक्सर, जिमिजीप, क्रेन्स, कॉपटर्स, ट्रायपॉड्स अशा कितीतरी आधुनिक प्रणालींचा समावेश असलेल्या सामुग्री या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरणार आहेत.

प्रदर्शनाच्या ठिकाणी ‘मॉडेल फोटो शूट’, बेसिक छायाचित्रण, तसेच अत्याधुनिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेर्‍याचा वापर, हाताळणी याविषयी कार्यशाळा आणि चित्रिकरणाची अत्याधुनिक सामुग्री वापराविषयी प्रात्यक्षिके असणार आहेत. पुण्यातील ‘ए एस बॉट्स’ या कंपनीने बनवलेला यंत्र मानव हे या प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार असून, या रोबोटकडून फोटो काढून घेण्याची, तसेच त्याच्याशी संवाद साधण्याची संधीही या प्रदर्शनात मिळणार आहे.

‘दर दोन तासांनी लकी ड्रॉ असून, विविध बक्षिसे मिळवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. प्रदर्शनास प्रवेश सर्वांना असून संकेतस्थळावर नोंदणी केल्यास प्रवेशिका मोफत आहेत. प्रदर्शनाच्या ठिकाणी माफक दरात प्रवेश दिला जाणार आहे,’ असे जैन यांनी परिषदेत सांगितले.

प्रदर्शनाविषयी :
कालावधी :
२६ ते २८ ऑक्टोबर २०१८
वेळ : सकाळी ११ ते सायंकाळी सात
स्थळ : गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे.
वेबसाइट : punephotofair.in
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Nimbalkar photoj About 324 Days ago
छान उपक्रम आहे फोटोसफर साठी हे पहिल्या दांच असे निर्णय घेऊन उत्तम नियोजन केलेल फोटो फेअर आहे मिररलेस विशेष माहिती मिळेल
0
0

Select Language
Share Link
 
Search