Next
शिवसेना - आम्ही पारदर्शक आहोत पण तुम्ही आहात का?
BOI
Friday, February 03, 2017 | 12:00 AM
15 0 0
Share this article:

केंद्र सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणात मुंबई महापालिकेतील कारभार स्वच्छ आणि पारदर्शक असल्याचे म्हटले होते. यावरुन शिवसेनेने भाजपचा सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेतला आहे. मुंबई महापालिकेतील पारदर्शी आणि स्वच्छ कारभारावरुन शिवसेनेने भाजपला टोमणा लगावला आहे. पारदर्शी कारभाराचा कोंबडा भाजपने कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी सूर्य उगवला आहे. आम्ही पारदर्शक आहोत पण तुम्ही आहात का असा सवालच शिवसेनेने भाजपला विचारला आहे. बोबड्या माफियांवर अंगठा चोखत बसण्याची वेळ आली अशा शब्दात सेनेने किरीट सोमय्या यांचे नाव न घेता भाजपला चिमटा काढला आहे.
राज्यातील भाजप सरकारने पारदर्शकतेच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर आरोप केले. पण त्यांच्याच केंद्र सरकारने त्यांना माती खायला लावली. भाजपला जास्त जागांची हाव होती, पारदर्शकता हा फक्त एक बनाव होता हे यातून स्पष्ट झाल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून विशेष मदत नसतानाही देशातील २१ महापालिकांमध्ये मुंबईने पहिला क्रमांक गाठला. यामुळे बोबड्या माफियांवर अंगठा चोखत बसण्याची वेळ आली अशा शब्दात सेनेने भाजपला चिमटा काढला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search