Next
‘स्वरपर्व’मध्ये अयान अली बंगश यांचे सरोदवादन
प्रेस रिलीज
Tuesday, March 13 | 03:27 PM
15 0 0
Share this story

अयान अली बंगश
पुणे : मराठी नववर्षाचे स्वागत आनंददायी स्वरांच्या साथीने करत एका नव्या, मंगलदायी स्वरपर्वाची सुरुवात व्हावी, या उद्देशाने पुण्यातील तालानुभूती फाउंडेशन आणि एमपी ग्रुप यांच्या वतीने ‘स्वरपर्व’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. 

या कार्यक्रमात सरोदवादक अयान अली बंगश यांचे सरोदवादन पुणेकरांना ऐकता येणार आहे. येत्या रविवारी, १८ मार्च रोजी,गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर  सकाळी नऊ वाजता मयूर कॉलनी, कोथरूड येथील एमईएस बालशिक्षण प्रशालेच्या सभागृहात हा कार्यक्रम रंगणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला व विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सर्वांना प्रवेश दिला जाईल.

प्रसिद्ध सरोदवादक पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान यांचे सुपुत्र अयान अली बंगश हे सेनई बंगश घराण्याच्या सातव्या पिढीतील सरोदवादक असून एक आश्वासक युवा कलाकार म्हणून त्यांनी अल्पावधीत लोकप्रियता मिळविली आहे. अयान अली बंगश यांना यावेळी तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे सुपुत्र व प्रसिद्ध तबलावादक सत्यजित तळवलकर हे तबल्यावर साथसंगत करणार आहेत.

कार्यक्रमाविषयी :
 ‘स्वरपर्व’ 
स्थळ : बालशिक्षण सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड
वेळ :  रविवार, दि.१८ मार्च, सकाळी ९ वाजता.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Mrunalini Mujumdar About 310 Days ago
A great event from MP group & Talanubhuti Foundation
0
0

Select Language
Share Link