Next
ग्रामस्थांसाठी रीझो लायब्ररी
BOI
Monday, May 22, 2017 | 06:34 PM
15 0 0
Share this article:

पुणे : भोर तालुक्यातील खोपी या गावामध्ये रोस्ट्रम इंडिया सोशल ऑर्गनायझेशन(रिझो) या सामाजिक संस्थेमार्फत 'रिझो लायब्ररी' नावाच्या उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. स्प्रिंगर नेचर ग्रुपचा एक भाग असलेल्या 'क्रेस्ट' या कंपनीने या उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य केले असून रिझो संस्थेने ग्रामस्थांना हव्या त्या पुस्तकांचा लाभ घेता यावा; तसेच विविध विषयांवर योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम खोपी या गावामध्ये सुरू केला आहे. 

‘रिझो लायब्ररी’ या प्रकल्पाचा लोकार्पण कार्यक्रम खोपी ग्रामस्थांच्या तसेच जवळपासच्या इतर गावातील काही मान्यवर व प्रतिष्ठित लोकांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला क्रेस्ट या कंपनीच्या वतीने निशा नाईक हजर होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन गावातील ‘फ्लोरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. अतुल पडाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. रिझो संस्थेचे संस्थापक व संचालक वैभव मोगरेकर, गौतमी बिडकर व दिवाकर मोगरेकर हे देखील उपस्थित होते, तसेच खोपी गावचे उपसरपंच मिथुन मारणे, माजी सरपंच आण्णा शिवरकर, वरवे गावचे सरपंच विक्रांत भोरडे व मुद्रा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक उमेश पवार इत्यादी मान्यवर मंडळींनी या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहून आपले विचार मांडले. खोपी गावाच्या वतीने गावचे आण्णा शिवरकर व वरवे गावाचे सरपंच विक्रांत भोरडे यांनी या सामाजिक लोक कल्याणात्मक प्रकल्पासाठी संस्थेचे आभार मानले. या कार्यक्रमात सर्व मान्यवर मंडळींनी आपले वाचानासंदर्भातील अनुभव लोकांसमोर व्यक्त केले, तसेच सर्वांना ग्रंथालये ही काळाची गरज असल्याचे महत्व पटवून देऊन मार्गदर्शन केले. 

रिझो लायब्ररी या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये मोफत ग्रंथालये / वाचनालये सुरू करण्यात येत आहेत. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे फक्त वाचनालय नसून, या युनिटच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना उद्योग व रोजगार मार्गदर्शन, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मदत, आरोग्य, वैद्यकीय उपचार मार्गदर्शन, करियर मार्गदर्शन, प्रौढ साक्षरता, महिला व बालकल्याण, तज्ज्ञ व्यक्तींकडून स्पर्धा परीक्षा, कृषिविषयक समस्या, रोजगार व उद्योग निर्मिती इत्यादी विषयांवर मार्गदर्शन व गावकऱ्यांच्या सहकार्यातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक कृती केली जाणार आहे, जेणेकरून त्या गावाचा सर्वांगीण विकास करता येईल. रिझो लायब्ररी हा उपक्रम ग्रामीण भागामध्ये वाचन संस्कृती रुजविणे, शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करणे, तसेच मराठी भाषेचे संवर्धन करणे, गावातील प्रत्येक वाचकाला हवे ते पुस्तक वाचनासाठी उपलब्ध करून देणे, अशा अनेक उद्देशाने सुरू करण्यात आलेला आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक संचालक दिवाकर मोगरेकर व गौतमी बिडकर यांनी दिली.

टीप : आपणही आपल्याजवळील जुनी पुस्तके संस्थेला दान करू शकता. पुस्तके किंवा इतर मदत करण्यासाठी संपर्क साधावा.

संपर्क :
वैभव मोगरेकर (संचालक सीएसआर व प्रोजेक्ट, रिझो) : ८४४६० ३०००३ 
संकेतस्थळ : www.rostrumindia.org  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramoadhye About 172 Days ago
It is two years since the press-release . Hope , it is still active . Best wishes .
0
0
Pravin suresh mahajan About
Best work for youth power sir
0
0

Select Language
Share Link
 
Search