Next
पंतप्रधान करणार ‘क्रेडाई’तील युवा विकसकांना मार्गदर्शन
प्रेस रिलीज
Monday, February 11, 2019 | 05:06 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘क्रेडाई नॅशनलतर्फे १३ व १४ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर ‘क्रेडाई युथकॉन २०१९’चे आयोजन केले आहे. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच तीन हजारांहून अधिक विकासकांसोबत संवाद साधणार आहेत. १३ फेब्रुवारीला केंद्रीय राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून १४ फेब्रुवारीला पंतप्रधान क्रेडाईमधील युवा विकसकांना मार्गदर्शन करतील,’ अशी माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी दिली.

‘क्रेडाई युथकॉन हा क्रेडाईच्या युथविंगचा नाविन्यपूर्ण उपक्रम भारतातील तरुण विकासकांसाठी एक सुयोग्य व्यासपीठ ठरणार आहे. हेच तरुण विकसक भविष्यातील बांधकाम क्षेत्राच्या प्रगतीचे चालक असल्याचे कटारिया यांनी सांगितले.

या वेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, ‘महारेरा’चे अध्यक्ष गौतम चटर्जी, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आदी मान्यवर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. परवडणारी घरे, ‘रेरा’मुळे बांधकाम क्षेत्रात आलेली पारदर्शकता, पायाभूत सुविधांची प्रगती, भारतीय अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीचा बांधकाम क्षेत्रावर होणारा परिणाम अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर या वेळी चर्चा होणार आहे.

क्रेडाई नॅशनलचे प्रेसिडेंट (इलेक्ट) सतीश मगर म्हणाले, ‘‘क्रेडाई युथकॉन २०१९’ ही भारतातील सर्वांत मोठी व भव्य रियल इस्टेट परिषद आहे. भारतातील बांधकाम क्षेत्राच्या विकासासाठी ‘क्रेडाई’ अविरत प्रयत्न करत आहे. यातून भारताच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी अत्यंत लाभदायक वातावरण निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search