Next
पवारांच्या विधानामुळे सेना – राष्ट्रवादी – काँग्रेस हातमिळवणी उघड - माधव भांडारी
BOI
Saturday, February 18, 2017 | 12:00 AM
15 2 0
Share this article:


भारतीय जनता पार्टीचं सरकार पाडून महाराष्ट्रामध्ये मध्यावधी निवडणुका घ्यायला लावण्याची भाषा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. गेले काही आठवडे काँग्रेस पक्ष,  शरद पवार आणि शिवसेना हे तिघेही एकाच सुरात बोलत आहेत. यावरुन त्यांची छुपी हातमिळवणी आता उघडकीस आली आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी शनिवारी मुंबईत केली.
 
शरद पवार यांची मध्यावधी निवडणुकांची इच्छा पूर्ण होणार नाही, असे सांगून माधव भांडारी यांनी स्पष्ट केले की, राज्यातील भाजपाचे सरकार स्थिर आहे. सरकार आपली पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण करेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उंचावत चाललेली प्रतिमा, त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध घेतलेली ठोस भूमिका व राज्य सरकारचा गतिमान कारभार यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वैफलग्रस्त झाले आहेत. त्यांच्या वैफल्याचे एकत्रित प्रदर्शन शरद पवार करीत आहेत.
 
15 2 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search