Next
‘प्रसन्न पर्पल’ला ‘एसएमई १००’ पुरस्कार
देशातील पहिल्या शंभर एसएमईमध्ये समावेश
BOI
Thursday, July 11, 2019 | 05:46 PM
15 0 0
Share this article:

प्रसन्न पटवर्धन यांनी केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘एसएमई १००’ हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. या वेळी लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रताप सारंगी उपस्थित होते.

पुणे : पुण्यातील ‘प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्युशन्स’ या वाहतूक सेवा देणाऱ्या संस्थेचा समावेश आता देशातील पहिल्या १०० लघु व मध्यम उद्योजकांमध्ये झाला आहे. नुकताच इंडिया एसएमई फोरमच्या वतीने देण्यात येणारा ‘एसएमई १००’ हा मानाचा पुरस्कार या संस्थेला प्रदान करण्यात आला.
 
प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्युशन्सचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्रसन्न पटवर्धन यांनी केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रताप सारंगी, एसएमई फोरमचे अध्यक्ष प्रल्हाद कक्कर हे या वेळी उपस्थित होते.

लघु व मध्यम आकाराच्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याबरोबरच देशातील इतरांसमोर एक उदाहरण उभे करणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नेटवर्किंग, संधी, भांडवल यासाठी आवश्यक ती मदत करणे यासाठी इंडिया एसएमई फोरम कार्यरत असते. याच दृष्टीकोनातून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील १०० लघु व मध्यम उद्योगांचा गौरव संस्थेतर्फे करण्यात आला. ज्यामध्ये देशभरातील तब्बल ३५ हजार उद्योगांमधून पहिल्या १०० उद्योगांमध्ये प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्युशन्सचा समावेश करण्यात आला आहे.

या वेळी प्रसन्न पटवर्धन म्हणाले, ‘इंडिया एसएमई फोरमच्या वतीने देशातील पहिल्या १०० लघु व मध्यम उद्योगांमध्ये आमचा झालेला समावेश ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. या पुरस्काराने आमचे मनोधैर्य वाढले असून, भविष्यात या क्षेत्रात आणखी काम करीत ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search