Next
सोशल मीडियावरील शुभेच्छा ‘कृतिशील’ होतात तेव्हा...
कोकणातील शिक्षकाच्या कल्पनेतून उभा राहिला शाळेसाठी निधी
संदेश सप्रे
Monday, December 24, 2018 | 12:56 PM
15 0 0
Share this article:

राज्य पातळीवर गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खो-खोपटू.

देवरुख :
सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी झाला, तर काय होऊ शकते हे रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात पाहायला मिळते आहे. देवरुखजवळच्या वांझोळे-सनगलेवाडीतील मराठी शाळेचे शिक्षक सदानंद आग्रे यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा देताना गावासाठी ठरावीक रक्कम गोळा करण्याचे आवाहन लोकांना केले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळून चक्क तीन लाख रुपये गोळा झाले. यातून शाळा डिजिटल तर झालीच; शिवाय उर्वरित निधी मुलांच्या क्रीडा विकासासाठी वापरण्यात आला. यातून खो-खोचे राष्ट्रीय स्तरावर चमकणारे खेळाडू घडले आहेत.

सोशल मीडियावर असलेल्या लोकांच्या माध्यमातून काही वेगळे करता येऊ शकेल, अशी कल्पना आग्रे यांना सुचली. त्यांनी स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबई मंडळाच्या सदस्यांना एकत्र आणून त्यांची बैठक घेतली. सोशल मीडियाचा वापर केवळ शुभेच्छा देण्यासाठी न करता गावाच्या भल्यासाठी करायचा असे बैठकीत ठरवण्यात आले. गावातील कुणाचा वाढदिवस असो वा लग्नाचा वाढदिवस, त्याला जो कोणी सोशल मीडियावर शुभेच्छा देईल, त्याने गावासाठी १०० रुपये जमा करायचे असे ठरवण्यात आले. जमलेल्या निधीचा विनियोग केवळ शाळा आणि विकासासाठी करायचा असा ठराव झाला. यासाठी वेगळी समिती तयार करण्यात आली. या समितीने हिशेबाची जबाबदारी घेतली. 

सोशल मीडियावर ग्रुप तयार करण्यात आला. यातून ठरल्याप्रमाणे संबंधित लोकांकडे पैसे जमा होऊ लागले. बघता बघता ही रक्कम तीन लाख रुपयांपर्यंत पोहोचली. निधीचा सर्वांत पहिला विनियोग शाळेच्या डिजिटायझेशनसाठी करण्याचे ठरले. सर्वांनी एकत्र येऊन हे काम पूर्णही झाले. 

गावातील मैदानावर खो-खोचा सराव करताना विद्यार्थी.

उर्वरित निधीचा उपयोग शाळेतील मुलांच्या क्रीडाविकासासाठी खर्च करण्याचे ठरविण्यात आले. शाळेतील विद्यार्थी खो-खो खेळात प्रवीण आहेत. याच खेळावर लक्ष केंद्रित करून मुलांना घडवण्याचे काम सुरू झाले. गावातील तेजस्वी सनगले आणि पल्लवी सनगले यांनी गावाचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले. आज त्यांच्या मागोमाग राज्य स्तरावर खो-खो खेळणारे २५ खेळाडू गावात तयार झाले आहेत. 

गावातील मुलांचा सामना जिथे असतो, तिथे मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी पालक हजर असतात. या खेळात देश पातळीवर खेळणारे खेळाडू कायमस्वरूपी घडावेत, यासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला असून, गावात खो-खोचे सुसज्ज मैदान तयार होणार आहे. यासाठीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रामस्थ सढळ हस्ते मदत करत आहेत. गावातील एकी आणि नेकी पाहून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तीन कोटी रुपयांचा रस्ताही मंजूर झाला आहे. सोशल मीडियाचा केवळ टाइमपाससाठी वापर न करता तो समाजासाठी केल्यास काय होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणून याकडे पाहता येईल.

संपर्क : सदानंद आग्रे - ८२७५४ ४९८९८
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ravindra Athalye About 271 Days ago
Fantastic Performance of Sadanand Agare Sir motivated the Villagers , resulting into Grant Success ! Vision 2020 ! Navaniman !!
2
0
madhav abande About 271 Days ago
एक आदर्श शिक्षक काय करू शकतो याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे सदानंद आग्रे सर ...खरोखरच जगाच्या पाठीवर असे कर्तुत्व करणारे एकमेव शिक्षक असतील ..
2
0
यशवंत चव्हाण About 271 Days ago
वांझोळे गावाचं नाव अटकेपार नेणाऱ्या श्री.आंग्रे सर व सर्व संबंधित महानुभाव तसेच हरहुन्नरी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन.पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
2
0

Select Language
Share Link
 
Search