Next
‘बांगलादेशात ‘डीकेटीई’चे विद्यार्थी सर्वच क्षेत्रात अग्रेसर’
एनयुबीचे डीन डॉ. हुमायु कबीर यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Saturday, February 23, 2019 | 02:57 PM
15 0 0
Share this article:

‘डीकेटीई’ इन्स्टिट्यूटमध्ये ‘टेक्स्टव्हीजन फॅशनोव्हा २०१९’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एनयूबीचे डीन डॉ. हुमायु कबीर आणि रिलायन्स इंडियाचे रिजनल हेड प्रशांत पळसुले.

इचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’ सोसायटीच्या टेक्स्टाइल अ‍ॅंड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये ‘टेक्स्टव्हिजन आणि फॅशनोव्हा २०१९’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले होते. सातहून अधिक बांगलादेशी विद्यार्थ्यांनी घेतलेला सहभाग हे या स्पर्धेचे आकर्षण ठरले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक व टाकाऊ वस्तूपासून नवीन उत्पादने तयार केली.

या वेळी बोलताना बांगलादेशातील नॉदर्न युनिर्व्हसिटीचे डीन डॉ. हुमायु कबीर यांनी ‘डीकेटीई’मध्ये असलेले संशोधनात्मक कार्य पाहून आपण प्रभावित झाल्याचे सांगितले. भविष्यकाळात युरोपियन प्रोजक्टस ‘डीकेटीई’समवेत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. अशा स्पर्धा आयोजित केल्याने विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तींना चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.स्पर्धेचे उद्घाटन डॉ. कबीर व रिलायन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे रिजनल हेड प्रशांत पळसुले यांच्या हस्ते झाले. डे.डायरेक्टर प्रा. डॉ. यू. जे. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले यांनी ‘डीकेटीई’चा आढावा घेऊन स्पर्धा आयोजित करण्यामागील भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. पी. एच. उके, प्रा. आर. एच. देशपांडे यांनी केले.

‘पेपर प्रेझेंटेशन’, ‘डिझाइन कलेक्शन व प्रेझेंटेशन’, ‘आय ऑन पिक ग्लास’ व ‘अ‍ॅक्सेसरीज स्पॉन्टेस्ट’ या स्पर्धेमध्ये विदेशातील व देशभरातील विविध इन्स्टिट्यूटमधील सुमारे ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत दक्षिण व पूर्व भारत, मुंबई, यवतमाळ, कोईमतूर, बेंगलोर, हैद्राबाद, सुरत, बडोदा, कोल्हापूर, दावणगिरी, अहमदनगर, तासगांव आदी ठिकाणांहून विद्यार्थी सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रशांत पळसुले यांनी ‘डीकेटीई’तील विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा देत ‘डीकेटीई’मध्ये जडणघडण होत असताना आम्हालादेखील विविध संधी प्राप्त झाल्यामुळेच आम्ही यशस्वी झालो, असे नमूद केले. देशाचा भावी अभियंता हा इंडस्ट्रीजमध्ये होणाऱ्या बदलांचे आव्हान पेलणारा असावा त्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रमाला स्मार्ट वर्कची जोड देण्याचे आवाहन त्यांनी केले.

‘टेक्स्टव्हिजन फॅशनोव्हा २०१९’मध्ये डिझाइन कलेक्शन स्पर्धेत देशभरातून आलेल्या विद्यार्थिनींनी केलेले सादरीकरण.

स्टुटंड चाप्टरचे अध्यक्ष पार्थ मर्दा यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. ‘फॅशनोव्हा’ या लक्षवेधी स्पर्धेत देशातील विविध भागातून आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी जुन्या कपड्यांना कल्पकतेची व नव्या फॅशनची जोड देत विविध वस्त्र प्रावरणे सादर केली होती. डिझाइन कलेक्शन व प्रेझन्टेशनमध्ये ऑरगॅनिक कॉटन, पॉलिस्टर, सिल्क तसेच बीट, झेंडू, हळद, पालक यांपासून रंगाची निर्मिती केली व यांचा वापर करून विविध ड्रेसेस, हॅट, नेकलेस, शूज, बूक कव्हर, पर्स अशा अनेक उत्पादनांची निर्मिती करत त्याचे सादरीकरण केले.

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून राहुल काळे, वाय. एस. शंकर, प्रा. एस. जी. कुलकर्णी व प्रा. ए. यू. अवसरे यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी रिलायन्स इंडियाचे चंद्रकात वास्कर आणि गुजरात हेवी केमिकल्सचे प्रतिनिधी, प्रा. एल. जी. पाटील, प्रा. व्ही. के. ढंगे, सौम्या चौधरी, टायमूचे व्हाइस प्रेसिडंट सी. आर. जामदार, प्रा. एस. एस. चिंचवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन क्षितिजा कांबळे यांनी केले. वैष्णवी बाहेती यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search