Next
अक्षयचा ‘मिशन मंगल’ स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांच्या भेटीला
चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
BOI
Tuesday, July 09, 2019 | 04:22 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : आर. बाल्की आणि जगन शक्ती यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘मिशन मंगल’ स्वातंत्र्यदिनी म्हणजेच येत्या १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून, अक्षयने हे पोस्टर सोशल मिडियावर शेअर केले आहे.
 
अभिनेता अक्षय कुमार सध्या ‘सूर्यवंशी’ या त्याच्या आगामी महत्त्वपूर्ण आणि बहुचर्चित सिनेमावर काम करत असून त्यादरम्यानच तो बाल्की यांच्या या ‘मिशन मंगल’ चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटात अक्षय एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये तो गंभीर रुपात दिसत आहे. 

‘‘मिशन मंगल’ म्हणजे भारताला मंगळ ग्रहापर्यंत घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीची कथा आहे आणि ताकद, धैर्य असणाऱ्या आणि कधीही हार न मानणाऱ्याची ही कथा आहे’, असे अक्षयने पोस्टरच्या शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. १५ ऑगस्ट रोजी तुमच्या भेटीला, असेही त्याने पुढे म्हटले आहे. ‘फॉक्स स्टार स्टुडिओज’ आणि ‘केप ऑफ गुड फिल्म’ मिळून हा चित्रपट करत आहेत. अक्षयसोबत इतरही अनेक बडे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत. 

अभिनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, किर्ती कुल्हारी, शर्मन जोशी, नित्या मेनन अशा कलाकारांची फौज या चित्रपटातून झळकणार आहे. याबाबत बोलताना अक्षय पुढे म्हणाला, ‘या स्वातंत्र्यदिनी स्वप्नांना पंख मिळतील. हॉलीवूडमध्ये आजवर अंतराळावर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. बॉलीवूडमधला हा पहिलाच चित्रपट असल्याने त्याचे वेगळेपण आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळणार होत्या, नव्याने समजणार होत्या म्हणून या चित्रपटाचा भाग होण्याची माझी इच्छा होतीच. या चित्रपटाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला नवीन माहिती आणि कल्पना व प्रेरणा मिळेल अशी आशा वाटते.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search