Next
‘नझारा’मध्ये ‘ई-स्पोर्टस्’ची गुंतवणूक
प्रेस रिलीज
Monday, February 12 | 06:06 PM
15 0 0
Share this story

मुंबई : जगभरातील एक प्रमुख ‘ई-स्पोर्टस्’ कंपनी म्हणून प्रख्यात असलेल्या ‘इएसएल’ने ‘नझारा टेक्नॉलॉजीस लिमिटेड’ (नझारा) या भारतीय कंपनीत छोटी गुंतवणूक केली आहे. ‘इएसएल’ची स्थापना २००० मध्ये झाली असून ही कंपनी हौशी तसेच व्यावसायिक लीग स्पर्धा आयोजित करते. जगभरातील महत्त्वाच्या क्रीडांगणावर होणाऱ्या विविध ऑनलाइन स्पर्धांचा ‘कंटेंट’ तसेच मूळ ‘प्रोग्रॅमिंग’च्या वितरण व्यवस्थापनात ही कंपनी काम करते. फेसबुक, ट्विटर, ट्विच, सोनी व्ह्यू, डिस्ने एक्सपी आणि हुलूसारख्या प्लॅटफॉर्मशी ही कंपनी जोडली गेली आहे.

‘इएसएल’ने त्याबरोबरच भारतामध्ये ‘ई-स्पोर्टस्’ची पायाभरणी करणाऱ्या (स्त्रोत : एफ अॅंड एस अहवाल) ‘नॉडवीन गेमिंग’ या कंपनीशी एक करार केला आहे. या कंपनीचा ताबा आता ‘नझारा’कडे आला आहे. ‘नॉडवीन गेमिंग’ने ‘इएसएल’बरोबर केलेले परवाना हक्क सुरक्षित राहिले आहेत. त्यामुळे भारतामध्ये ‘इएसएल’ स्पर्धांच्या आयोजनाचा मार्ग खुला झाला आहे. ‘नॉडवीन’कडे भारतीय उपखंडातील ‘इएसएल’ जागतिक कंटेंटच्या मिडीया वितरणाचे हक्कही उपलब्ध झाले आहेत.

‘इएसएल’तर्फे जगभरात दरवर्षी हजारो गेमिंग स्पर्धांचे आयोजन केले जाते. ‘इएसएल’चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राल्फ रीचर्ट ‘ई-स्पोर्टस्’च्या भरभराटीबद्दल म्हणाले, ‘जगभराच्या कानाकोपऱ्यात पसरलेले क्रीडारसिक आणि खेळाडूंपर्यंत ‘ई-स्पोर्टस्’ ही संकल्पना पोचविण्याचे आमचे ध्येय आहे. ‘नझारा’ ही मोबाईल गेमिंग क्षेत्रामधील आघाडीची कंपनी आहे. ही कंपनी स्थानिक भागीदारी करून ‘इएसएल’ची व्याप्ती आणखी वाढवेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.’

‘नझारा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष आगरवाल म्हणाले, ‘आमच्या शेअरधारक कुटुंबामध्ये मी ‘इएसएल’चे स्वागत करतो. ‘इएसएल’च्या भागीदारीमुळे जागतिक पातळीवरचे खेळ भारत आणि इतर प्रमुख बाजारपेठेत उपलब्ध होतील. ‘इएसएल’ आणि ‘नॉडवीन गेमिंग’बरोबरील भागीदारीमुळे आम्हाला ‘इएसएल’चा जागतिक पातळीवरील अनुभव मिळेल आणि ‘नॉडवीन गेमिंग’चा प्रत्यक्ष काम करण्याचाही अनुभव पदरात पडेल. त्यामुळे ‘नझारा’चे विविध देशांच्या बाजारपेठेमधील नेटवर्क आणखी भक्कम होईल.’

‘नॉडवीन गेमिंग’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक अक्षत राठी म्हणाले, ‘राल्फ आणि ‘इएसएल’ हे नेहमीच आमचे पाठीराखे राहिलेले आहेत. भारतामधील ‘ई-स्पोर्टस्’ आणि ‘नॉडवीन’ची भरभराट त्यांना पाहिली आहे. ‘नझारा’ आणि ‘इएसएल’मुळे ‘नॉडवीन’ आगामी काळात एक झपाट्याने फोफावणारा खेळ म्हणून ‘ई-स्पोर्टस्’ पुढे जाण्यासाठी काम करील.’

‘नझारा’ने पैसे उभारणीसाठी ‘डीआरएचपी’ (ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स) सादर केले आहे. त्यानुसार या कंपनीला ‘आयआयएफएल’ अॅसेट मॅनेटमेंटकडून गुंतवणूक प्राप्त झाली आहे. नेक्स्टवेव्ह मल्टिमिडीया, मास्टरमाइंड स्पोर्टस्, मोंग लॅब्ज आणि हलाप्ले या कंपन्यांमध्ये सध्या ‘नझारा’ची गुंतवणूक आहे. भारताबरोबरच जगभरातील मध्यपूर्व देश, आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशियामधील प्रांतांमध्ये आपल्या कंपनीचे जाळे पसरण्याची ‘नझारा’ची योजना आहे. ‘इएसएल’ची ‘नझारा’मधील गुंतवणूक आणि ‘नॉडवीन’बरोबरचे हक्क सुरक्षित केल्यामुळे ‘नझारा’ला ‘ई-स्पोर्टस्’ क्षेत्रामधील व्यवसाय संधीचा लाभ घेणे शक्य होणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link