Next
‘होंडा’तर्फे एप्रिलमधील वाहनविक्रीचे आकडे जाहीर
प्रेस रिलीज
Friday, May 04 | 05:11 PM
15 0 0
Share this story

गुरगाव : होंडा मोटारसायकल अॅंड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एचएमएसआय) कंपनीने एप्रिल महिन्यामधील वाहनविक्रीचे मोठे आकडे जाहीर करून चालू आर्थिक वित्तीय वर्षाची सुरुवात दणक्यात केली आहे.

‘होंडा २ व्हीलर्स इंडिया’ने चालू वित्तीय आर्थिक वर्षामधील एप्रिल या पहिल्या महिन्यामध्येच वाहनविक्रीचा सहा लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशांतर्गत विक्रीच्या आकड्यांमध्ये १५ टक्क्यांची वृद्धी झाली आहे. एप्रिल २०१७मध्ये हा आकडा पाच लाख ५१ हजार ७३२ एवढा होता, तो एप्रिल २०१८ अखेर सहा लाख ३५ हजार ८११ या संख्येवर जाऊन पोचला आहे.

विशेष बाब म्हणजे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये ‘होंडा’च्या स्कूटर आणि मोटारसायकलच्या विक्रीचे हे सर्वाधिक आकडे आहेत. ‘होंडा’ने पहिल्यांदाच एका महिन्यामध्ये चार लाखांहून अधिक स्कूटरविक्रीची कामगिरी नोंदवली आहे. एप्रिल २०१७मध्ये स्कूटर्सची विक्री संख्या तीन लाख ६८ हजार ५५० होती; मात्र या एप्रिलमध्ये स्कूटरविक्रीमध्ये १५ टक्क्यांनी वाढ होऊन हा आकडा चार लाख २३ हजार ५२७ वर जाऊन पोचला आहे.

‘होंडा’च्या मोटारसायकलचीही एप्रिल २०१८ या महिन्यात नेत्रदीपक कामगिरी झाली असून, एका महिन्यात दोन लाख वाहनविक्रीची कामगिरी पहिल्यांदाच नोंदवली गेली आहे. एप्रिल २०१७मध्ये मोटारसायकल विक्रीचा आकडा एक लाख ८३ हजार १८२ एवढा होता. एप्रिल २०१८मध्ये त्यामध्ये १६ टक्क्यांची भर पडून तो दोन लाख १२ हजार २८४वर जाऊन पोचला आहे. ‘होंडा’च्या वाहननिर्यातीमध्येही या महिन्यात ७० टक्क्यांची भर पडली असून, एकूण ४६ हजार ७७ वाहनांची निर्यात करण्यात आली आहे.

एप्रिल २०१८मधील या नेत्रदीपक कामगिरीबद्दल ‘होंडा’चे वरिष्ठ उपाध्यक्ष यादविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘भारतवासियांकडून ‘होंडा’च्या वाहनांवरील प्रेम सध्या ओसंडून वाहत आहे. एप्रिल महिन्यामध्ये यापूर्वीचे वाहनविक्रीचे सर्व विक्रम आम्ही मोडीत काढले आहेत. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात आम्ही ‘होंडा’च्या पाच लाख वाहनांची विक्री केली होती; मात्र अवघ्या वर्षभराच्या कालावधीमध्ये आम्ही हा आकडा पार करून सहा लाखांवर जाऊन पोचलो आहोत. ‘होंडा’वर विश्वास ठेवणाऱ्या सर्व ग्राहकांचे आम्ही या प्रेमाबद्दल आभारी आहोत. भारतामधील स्कूटर्सच्या विक्रीला पुन्हा एकदा चालना मिळाली असून अवघ्या एका महिन्यामध्ये आम्ही चार लाख वाहनांची विक्री करण्यात यशस्वी ठरलो आहोत. स्कूटरप्रमाणेच मोटारसायकलच्या विक्रीमध्येही आमची प्रगती तशीच सुरू असून, एप्रिल महिन्यात आम्ही दोन लाखांहून अधिक वाहने विकली आहेत. देशांतर्गत विक्रीबरोबरच आम्हांला विदेशी ग्राहकांकडूनही यंदा मोठा प्रतिसाद लाभला आहे.’

एप्रिलमधील कामगिरीचे काही ठळक मुद्दे :
२०१८-१९ वर्षामधील पहिल्या तिमाही निष्कर्षांची घोषणा : सलग तिसऱ्या वर्षी ‘होंडा’ने दुहेरी आकड्यांमधील वृद्धीचे लक्ष्य आखले. चालू आर्थिक वर्षामध्ये ८०० कोटी गुंतवणुकीचा आरेखन करण्यात आले आहे. या वर्षी ग्राहकांसाठी १ नवा कोरा वाहनब्रॅंड बाजारात येणार असून १८ वाहन ब्रॅंड्सचे ‘अपग्रेडेशन’ होणार आहे. अधिकाधिका ग्राहकांपर्यंत पोचण्याचा ‘होंडा’चा मानस असून चालू वर्ष अखेरपर्यंत ‘होंडा’चे जाळे सहा हजार ग्राहकांसाठी विस्तारेल. तसेच ग्राहकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी ‘होंडा’तर्फे या वर्षीपासून ‘जॉय क्लब’ सुरू करण्यात येणार आहे.

भारतामधील ‘होंडा’ची ब्रॅंडची शक्ती वृद्धिंगत करण्यासाठी नवीन ब्रॅंड आणि संपर्क कृतीची योजना आखण्यात आली आहे. अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त साधत ग्राहकांनी ‘होंडा’ ब्रॅंडवर विश्वास ठेवीत एकाच दिवशी मोठी खरेदी केली. परिणामी वाहनविक्रीचा आकडा ८० टक्क्यांनी वाढला. ‘होंडा’च्या १२५ सीसी इंजिन क्षमतेच्या ‘ग्राझिया’ स्टूकरने अवघ्या पाच महिन्यांमध्ये एक लाख विक्रीचा विक्रमी टप्पा पार केला.

राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहामध्ये ‘होंडा’तर्फे सुमारे ७० हजार वाहनचालकांपर्यंत रस्ता सुरक्षा अभियानाची माहिती पोचविण्यात आली. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय रेसिंग स्पर्धांमध्ये भारतीय चालकांची कामगिरी उंचावण्यासाठी ‘होंडा’तर्फे आता प्रयत्न करण्यात येणार आहेत. ‘होंडा टू व्हीलर्स इंडिया’चा भारतीय संघ तयार करण्यात आला असून अनिश शेट्टी या चालकाने ऑस्ट्रेलियातील ‘आशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप’मध्ये दुसऱ्या फेरीमध्ये चमकदार कामगिरी नोंदवली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link