Next
‘एक टप्पा आउट’चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री पर्ण पेठे
BOI
Wednesday, July 03, 2019 | 12:30 PM
15 0 0
Share this article:

‘स्टार प्रवाह’वर पाच जुलै २०१९पासून सुरू होणाऱ्या नव्या कॉमेडी रिअॅलिटी शो ‘एक टप्पा आउट’चे सूत्रसंचालन अभिनेत्री पर्ण पेठे करणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिचे छोट्या पडद्यावर पदार्पण होत आहे. पर्णला याआधी सिनेमा आणि प्रायोगिक नाटकांमधून बघितले आहे; मात्र टेलिव्हिजन करण्याचा तिचा अनुभव आणि ‘एक टप्पा आउट’ या विषयी जाणून घेण्यासाठी पर्ण पेठेशी साधलेला संवाद. 
--------------------------------------------------------------
* ‘स्टार प्रवाह’वर सुरू होणाऱ्या ‘एक टप्पा आउट’च्या निमित्ताने तुझे छोट्या पडद्यावर पदार्पण होत आहे त्याविषयी...
- या शोच्या निमित्ताने माझे टेलिव्हिजनवर पदार्पण होत असल्यामुळे बऱ्याच वर्षांपासूनची माझी इच्छा पूर्ण होत आहे. कॉमेडी हा माझा प्रांत नाही, पण या मंचावर खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. आमचे तिनही परीक्षक आणि मेंटॉर्स विनोद कोळून प्यायले आहेत. त्यांच्यासोबत स्टेज शेअर करणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. स्पर्धकांची एनर्जीही भन्नाट आहे. ते ज्या मेहनतीने सादरीकरणाची तयारी करतात ते कौतुकास्पद आहे. ‘एक टप्पा आउट’ हा कार्यक्रम म्हणजे माझ्यासाठी समृद्ध करणारा अनुभव आहे.

* सूत्रसंचालनात काय वेगळेपण पाहायला मिळेल?
- खरंतर होस्ट म्हणजे स्पर्धक आणि प्रेक्षकांमधला दुवा असतो असे मला वाटते. त्यामुळे बोलीभाषेत संवाद साधण्याचा मी प्रयत्न करते. आजची तरुण पिढी ज्या भाषेत एकमेकांशी संवाद साधतात अगदी तशाच पद्धतीने हा संवाद असतो.

* लूकबद्दल काय सांगशील?
- नेहा चौधरीने माझा लूक डिझाइन केला असून, तो खूपच ग्लॅमरस आहे. दर आठवड्याला लूक्सच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करायला मिळत आहेत. प्रत्येक भागात प्रेक्षकांसमोर वेगळ्या अंदाजात यायला मिळणार याचा आनंद आहे.

* जॉनी लीवर, निर्मिती सावंत, भरत जाधव परीक्षकांच्या भूमिकेत आहेत... त्यांच्याविषयी काय सांगशील?
- ‘एक टप्पा आउट’चे तीनही परीक्षक म्हणजे उत्साहाचा अखंड झरा आहेत. सिनेमा, नाटक आणि टीव्ही याचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. हे तिघेही जेव्हा सेटवर येतात तेव्हा सेटवरचे वातावरणच बदलून जाते. कर्तुत्वाने ही माणसे कितीही मोठी असली, तरी त्यांच्यातला साधेपणा आम्हा सर्वांनाच भावतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले स्पर्धक रेशम टिपणीस, अभिजित चव्हाण, विजय पटवर्धन, आरती सोळंकी या मेंटॉर्सच्या मार्गदर्शनाखाली तयार होत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी ‘एक टप्पा आउट’ म्हणजे एक सुखद अनुभव असेल. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search