Next
आक्का, मी आणि...
BOI
Monday, August 26, 2019 | 12:08 PM
15 0 0
Share this article:

मराठी वाङ्मयात स्वतःची स्वतंत्र मुद्रा निर्माण करणाऱ्या असामान्य कवयित्री इंदिरा संत परिस्थितीशी झुंज देत उभ्या राहिल्या. प्रसिद्ध कवयित्री, कर्तृत्ववान स्त्री, गृहिणी, आदी भूमिकांतील इंदिरा संत यांचे साधे आणि सखोल व्यक्तिमत्त्न त्यांच्या धाकट्या सूनबाई वीणा संत यांनी ‘आक्का, मी आणि... ’ या पुस्तकामधून उलगडून दाखविले आहे. सासूबाई म्बहणून, आजी म्हणून, घरातली मोठी व्यक्ती म्हणून त्या कशा दिसल्या अन् जाणवल्या याचे स्वानुभवकथन त्यांनी केले आहे. नाना अडचणींमधून, कुणाकडेही दयेचा विषय न होता, स्वत्व राखून स्वतः घडत आणि मुलांना घडवत आलेल्या आपल्या सासूबाईंचे स्वतः घेतलेले अनुभव, इतरांनी लिहिलेल्या-सांगितलेल्या आठवणी, आक्कांनी वेगवेगळ्या संदर्भात इतरांना लिहिलेली आणि सामान्य रसिकांपासून नामवंतांपर्यंत अनेकांनी आक्कांना लिहिलेली पत्रे, रोजनिशीत आक्कांनी केलेल्या नोंदी, आक्कांबद्दल केलेले लेखन असे सारे भांडार या पुस्तकाद्वारे रसिक वाचकांसमोर खुले झाले आहे.

पुस्तक : आक्का, मी आणि...
लेखिका : वीणा संत
प्रकाशन : बुकगंगा पब्लिकेशन्स
पृष्ठे : ३१६
मूल्य : ३४९ रुपये

(‘आक्का, मी आणि...’ हे पुस्तक आणि ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)


(इंदिरा संत यांच्याबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा. इंदिरा संत यांच्या ‘रक्तामध्ये ओढ मातीची’ या कवितेबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘दारा बांधता तोरण’ या कवितेबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. त्यांची ‘गवतफुला रे गवतफुला’ ही कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search