Next
रोपळे प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती
BOI
Thursday, January 04 | 04:21 PM
15 0 0
Share this story

पंढरपूर : तालुक्यातील रोपळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन व किशोरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी प्रशालेतील मुलींनी ‘मी स्वतंत्र बालिका आहे... माझे भवितव्य मी घडविणार... शिक्षण अर्धवट सोडणार नसून वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही’, अशी प्रतिज्ञा केली.

प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मुलींच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘बाइट्स ऑफ इंडिया’चे प्रतिनिधी मोहन काळे, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब लोखंडे, सय्यद शेख व मुख्याध्यापक सुनील शिंदे उपस्थित होते.

या वेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींना खाऊचे वाटप केले. दरम्यान दुपारी विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्र भोजन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिद्धेश्वर लेंगरे, विजया कोळी, उषा कांबळे, राणी व्हणमाने, आजिनाथ पवार, नबीलाल परकाळे, समाधान आयरे, कृष्णा पाडवी, माधुरी दुरूगकर आदींनी प्रयत्न केले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link