Next
अरुअप्पा जोशी अकादमीच्या गंधाली, कीर्तिकुमार यांचा सत्कार
स्पर्धा परीक्षेत यश
BOI
Wednesday, May 15, 2019 | 02:53 PM
15 0 0
Share this article:

कीर्तिकुमार गायकवाड व गंधाली जाधव यांचा सत्कार करताना (अनुक्रमे) सतीश शेवडे व शिल्पा पटवर्धन. शेजारी मनोज पाटणकर, इंदुमती मलुष्टे व मंदार गाडगीळ.

रत्नागिरी :
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतून मार्गदर्शन घेऊन गंधाली प्रवीण जाधव हिने करसहायक पद परीक्षेत यश मिळवले. तसेच कीर्तिकुमार अच्युत गायकवाड पीएसआय पदासाठी पात्र ठरले आहेत. या दोघांचाही संस्थेतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, सीए मंदार गाडगीळ, मनोज पाटणकर आणि अकादमीच्या समन्वयक अॅड. इंदुमती मलुष्टे या वेळी उपस्थित होत्या.

पाचल (ता. राजापूर) येथील गंधालीने ११ वी ते बीएस्सीपर्यंतचे शिक्षण गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात घेतले. करसहायक या पदासाठी तिने जून २०१८मध्ये पूर्वपरीक्षा दिली. मुख्य परीक्षा दोन डिसेंबर २०१८ रोजी झाली. अशा प्रकारे परीक्षा देऊन करसहायक पदासाठी पात्र ठरलेली ती बहुधा रत्नागिरीतील पहिलीच विद्यार्थिनी आहे. तिचे संस्थेने अभिनंदन केले.

कीर्तिकुमार गायकवाड यांचे मूळ गाव रत्नागिरी. लातूरच्या बिडवे कॉलेजमधून बीई (इलेक्ट्रॉनिक्स) झाल्यावर त्यांनी अरुअप्पा जोशी अकादमीतून २०१७मध्ये प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. जुलै २०१७मध्ये पूर्वपरीक्षा, ऑक्टोबरमध्ये मुख्य परीक्षा व ऑक्टोबर २०१८मध्ये शारीरिक चाचणी, मुलाखतीनंतर त्यांची पीएसआय पदासाठी निवड झाली. लवकरच त्यांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे.

अकादमीच्या आणखी दोन विद्यार्थ्यांनी नुकतेच यश मिळवले आहे. फाउंडेशन कोर्स २०१५-१६चे विद्यार्थी रवींद्र मुंडे यांची एमपीएससीद्वारे घेतलेल्या खात्यांतर्गत परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. तसेच शंतनू दुधाणे यांची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेअंतर्गत महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक कार्यकारी अभियंतापदी (वर्ग एक) निवड झाली आहे. या यशाबद्दल संस्थेतर्फे सर्वांचे कौतुक करण्यात आले.

(रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील मधुलिका देवगोजी-कदम हिचा यंदा यूपीएससी परीक्षेत देशात १९०वा क्रमांक आला. तिची मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search