Next
दमपुख्त बिर्याणी आणि नॉनव्हेज पुलाव + नवाबी नॉनव्हेज आणि व्हेज खजाना + नॉनव्हेज १०० पदार्थ
BOI
Monday, September 10 | 10:12 AM
15 0 0
Share this story

अस्सल खवय्ये शाकाहाराप्रमाणेच मांसाहावारही ताव मारतात. चिकन, मटण व मासे या तिन्ही प्रकारांतही वेगवेगळे पदार्थ कसे करायचे, हे मधुबाला सातव यांनी ‘नॉनव्हेज’मधून सांगितले आहे. मटण कसे घ्यावे, शिजवावे, नॉनव्हेज मसाल्याच्या टिप्स देऊन विविध प्रकारचे मटण, रोगन जोश, मटण चॉप्स, खिमा, तसेच चिकन, मासे, कोळंबी नॉनव्हेजबरोबर खाण्यासाठी पराठे, सूप, सॅलड, स्वीट डिश, डेझर्ट अशा १०० पाककृती यात आहेत.

नॉनव्हेज म्हटले की बिर्याणी आलीच. वैजयंती केळकर यांनी ‘दमपुख्त बिर्याणी आणि नॉनव्हेज पुलाव’मधून मटण-चिकनच्या बिर्याणीचे प्रकार, फिश बिर्याणी, नॉनव्हेज पुलाव, फ्राइड राइस व व्हेज बिर्याणीच्या अनेक पदार्थांच्या कृती दिल्या आहेत. नॉनव्हेजसाठी लखनौ प्रसिद्ध आहे. अशा नवाबी पदार्थांच्या रेसिपी मनोरमा हरिसिंग बरन यांनी ‘नवाबी नॉनव्हेज आणि व्हेज खजाना’मध्ये दिल्या आहेत. यात सूप, स्टार्टर्स, सी-फूड, मटण-चिकन रेसिपी, मटण-चिकन विथ राइस असे प्रकार आहेत. वैशिष्ट्यपूर्ण शाकाहारी पदार्थांच्या कृती यात आहेत.

प्रकाशक : साठे प्रकाशन
पाने : २०८
किंमत : १९५ रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link