Next
रावसाहेब पुजारी यांना कृषिभूषण पुरस्कार जाहीर
चार नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात प्रदान होणार
BOI
Thursday, November 01 | 05:09 PM
15 0 0
Share this story

कोल्हापूर : शेती-प्रगती मासिकाचे संपादक रावसाहेब पुजारी यांना गोवा कला आणि सांस्कृतिक संचालनालय व शिक्षक विकास परिषदेचा २०१८ या वर्षाचा कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठीचा कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. 

रविवारी, चार नोव्हेंबर २०१८ रोजी कोल्हापुरातील शाहूपुरीमधील महालक्ष्मी सांस्कृतिक भवनाच्या सभागृहात हा पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे. गोव्याचे कला आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री गोविंद गावडा आणि इतर मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत. ही माहिती शिक्षण विकास परिषदेचे अध्यक्ष आर. व्ही. कुलकर्णी यांनी दिली. 

पुजारी गेली ३२ वर्षे पत्रकारितेत कार्यरत आहेत. शेती-प्रगती मासिकाचे ते संपादक आहेत. ते प्रयोगशील शेतकरीही आहेत. त्यांनी शेतीविषयक सहा पुस्तके लिहिली आहेत. तसेच त्यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या शेतीमित्र पुरस्कारासह ‘सीएसई, नवी दिल्ली’ची शोध पत्रकारितेसाठीची फेलोशिप मिळालेली आहे. शेतीविषयक पुस्तक प्रकाशनाच्या क्षेत्रातही त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Nawab Shaikh About 16 Days ago
Sir, abhinandan
0
0
gaganvihari padhye About 18 Days ago
अभिनंदन ,आणखी काम करायला प्रेरणा मिळेल
0
0
Ajitkumar Patil, Bahubali About 18 Days ago
Hearty Congratulations for winning KRISHI BHUSHAN Award!
0
0

Select Language
Share Link