Next
‘यशोयुतां वंदे’ने घडवले सावरकरांच्या पैलूंचे दर्शन
BOI
Monday, January 15, 2018 | 03:26 PM
15 0 0
Share this article:

पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केलेले अस्पृश्यता निवारणाचे काम, त्याविषयी लिहिलेले साहित्य, देशाविषयी व्यक्त केलेले विचार अशा त्यांच्या विविध अपरिचित पैलूंचे दर्शन घडवणारा ‘यशोयुतां वंदे’ हा कार्यक्रम शनिवारी, १३ जानेवारी रोजी सायंकाळी शनिवारवाड्यावर सादर करण्यात आला. संगीत, नृत्य, शिल्प, साहित्य अशा विविध कलांच्या माध्यमातून ८० कलाकारांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली. 

विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींनी एकत्र येऊन ‘अहर्निशं’ ही संस्था स्थापन केली असून, संस्थेच्या कार्याची सुरुवात या कार्यक्रमाने करण्यात आली. संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरणही या वेळी करण्यात आले. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन सारंग कुलकर्णी यांनी केले होते, तर संहिता दीपा सपकाळ यांची होती. नृत्यरचना रसिका गुमास्ते यांनी केली होती. संगीत अर्चना पंतसचिव यांचे होते. यात सहभागी झालेल्या कलाकारांनी सादर केलेल्या प्रत्येक कलाविष्काराला रसिकांनी भरभरून दाद दिली. 

(या कार्यक्रमांची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search