Next
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त तुळापुरात कार्यक्रम
प्रेस रिलीज
Tuesday, March 13 | 04:39 PM
15 0 0
Share this story

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुळापूर येथे आयोजित कार्यक्रमांची माहिती देताना तुळापूरचे सरपंच गणेश पुजारी, उपसरपंच राहुल राऊत, रुपेश शिवले आदी.
पुणे : ‘धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशेएकोणतिसाव्या  पुण्यतिथीनिमित्त पुणे जिल्हा परिषद, हवेली पंचायत समिती आणि श्री क्षेत्र तुळापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र तुळापूर येथे शनिवारी, १७  मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे’, अशी माहिती तुळापूर गावचे सरपंच गणेश पुजारी, उपसरपंच राहुल राऊत, माजी सरपंच रुपेश शिवले व माजी उपसरपंच अमोल शिवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.


‘या कार्यक्रमासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, अन्न व नागरी पुरवठा आणि पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट, खासदार आढळराव पाटील, खासदार अॅवड. वंदना  चव्हाण,  अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, माजी अध्यक्ष प्रदीप कंद, आमदार बाबुराव पाचर्णे, आमदार दिलीप वळसे-पाटील, जिल्हाधिकारी सौरभ राव  यांच्यासह पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितिन काळजे, आमदार महेश लांडगे, आमदार जगदीश मुळीक, माजी आमदार अशोक पवार, बापूसाहेब पठारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी सभापती मंगलदास बांदल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत’, असेही पुजारी यांनी सांगितले. 

‘सकाळी आठ वाजता श्री संगमेश्वराचा अभिषेक व श्री छत्रपती शंभुराजांच्या पूजेने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर दहा वाजता साखळदंडाचे पूजन व ह.भ.प. रोहिदास महाराज हांडे, शिवव्याख्याते गजानन वाव्हळ, शंभुव्याख्यात्या ह.भ.प. गितांजलीताई झेंडे यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभुमहाराजांना साथ देणार्या  मावळ्यांच्या वंशजांचा सन्मान करण्यात येईल. साडे अकरा वाजता खोपोली येथील शिवशाहीर वैभव घरत यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम होईल. श्री क्षेत्र पुरंदर ते श्री क्षेत्र तुळापूर या मार्गाने आलेल्या छत्रपती श्री संभाजी महाराज पालखीचे आगमन होईल. दुपारी एक वाजता सर्व शंभुभक्तांच्या उपस्थितीत मानवंदना देऊन हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येईल. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल’, अशी माहिती पुजारी यांनी दिली. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link