Next
अग्निकुंड
BOI
Friday, January 12 | 11:41 AM
15 0 0
Share this story

पतीकडून फसवले गेल्याने पराकोटीच्या संतापाने स्वतःच अग्निकुंड बनलेल्या स्त्रीची कहाणी म्हणजे ‘अग्निकुंड.’ या कादंबरीचा हा परिचय...
...........
एखादा भडकलेला अग्नी चेतत राहून आजूबाजूला जबरदस्त धग उत्पन्न करतो. त्या अग्निकुंडासारख्याच असंतोषाच्या आणि क्रोधाच्या ज्वाला एखाद्या स्त्रीच्या मनात खदखदत असतील तर? कसं जगेल ती तिचं आयुष्य?

साक्षात ज्या पतीबरोबर संपूर्ण आयुष्य घालवायचं त्या पतीनेच धोका देऊन, स्वतः मनोरुग्ण असल्याचं गुपित लपवून तिला आपल्याबरोबर आयुष्य जगण्यासाठी भाग पाडलं असेल तर? असं फसवलं गेल्यामुळे पराकोटीचा संताप आणि समाजातल्या अवहेलनेचा अपमानी सल मनात वागवताना स्वतःच एक धगधगतं अग्निकुंड बनलेली आई आणि ते मनोरुग्ण वडील यांच्यात उडणाऱ्या ठिणग्यांचे चटके सोसत लहानाचं मोठं होत गेलेल्या दोन भावंडांची हृदयद्रावक कहाणी डॉ. नयनचंद्र सरस्वते यांनी ‘अग्निकुंड’ या आत्मकथनात्मक कादंबरीत मांडली आहे. 

पती मनोरुग्ण असल्याचं लग्नानंतर कळल्यावर आईच्या मनात अर्थातच फसवणुकीची भावना निर्माण झाली आणि संताप संताप होऊन त्या क्रोधाच्या आगीत सर्व चांगुलपणा जळून खाक झाला. घर आणि दवाखान्याच्या चकरा यांमध्ये तिची भावनिक फरपट होत गेली. एकीकडे पत्नी म्हणून आपली कर्तव्यं पार पाडताना एका आईची कर्तव्यं तिला निभावता आली नाहीत आणि ती कायम अपयशी ठरली, हे सांगणारे अनेक भावपूर्ण प्रसंग सरस्वते यांनी कथन केले आहेत. ही कादंबरी आईच्या आयुष्यातल्या शेवटच्या २७ दिवसांभोवती फिरते. आणि अखेर ते धगधगत शांत होताना भावनांचा आगडोंब मागे ठेवून जातं, त्याची मनाचा ठाव घेणारी कथा म्हणजे ‘अग्निकुंड.’

पुस्तक : अग्निकुंड
लेखिका : नयनचंद्र सरस्वते
प्रकाशक : काषाय प्रकाशन
पृष्ठे : २८८ 
मूल्य : २७० रुपये 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link