Next
अभियंता दाम्पत्याच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन
BOI
Thursday, February 01, 2018 | 11:52 AM
15 0 0
Share this story

कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना (डावीकडून) स्नेहसुधा कुलकर्णी, प्रदीप निफाडकर, डॉ. कैलास कमोद, उपेंद्र कुलकर्णी, शर्मिला कुलकर्णी

पुणे :
‘हल्लीचा वाचकवर्ग कवितांपासून दुरावला आहे. या वर्गाला पुन्हा कवितेकडे वळवण्याचे काम ‘तुझा मोहोर मखमली’ हा कवितासंग्रह करील,’ असा विश्वास डॉ. कैलास कमोद यांनी व्यक्त केला. अभियंता असलेल्या उपेंद्र आणि शर्मिला कुलकर्णी या दाम्पत्याच्या कवितांच्या ‘तुझा मोहोर मखमली’ हा काव्यसंग्रह नुकताच पुण्यात प्रकाशित झाला. त्या वेळी ते बोलत होते. नीहारा प्रकाशनातर्फे हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कैलास कमोद, तर अध्यक्ष म्हणून गझलकार प्रदीप निफाडकर उपस्थित होते. उपेंद्र आणि शर्मिला कुलकर्णी हे दाम्पत्य पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियंता झालेले असून, नोकरीनिमित्त जगभरातील विविध देशांत त्यांचे वास्तव्य होते; मात्र तरीही त्या त्या देशातील मराठी साहित्य वर्तुळात लेखन आणि साहित्यिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असे. त्याचा संदर्भ घेऊन, ‘अनेक वर्ष देशाबाहेर राहूनही या अभियंता जोडप्याने आपले मराठीपण जपले आहे, हे कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कविता हृदयाला भिडणाऱ्या असून, त्यातील भावना ‘या हृदयीच्या त्या हृदयी उमटतील,’ असा विश्वास डॉ. कैलास कमोद यांनी व्यक्त केला.

निफाडकर यांनी अध्यक्षीय भाषणात या दोघांच्या कवितांचे वेगळेपण मांडले. ‘आजच्या कवयित्रींच्या कविता या टोकाच्या स्त्रीवादी होतात; पण त्यातून खरे स्त्रीत्व मागे पडते आहे; पण शर्मिला कुलकर्णी यांच्या कवितांचे वेगळेपण ठसठशीतपणे समोर येते. उपेंद्र कुलकर्णी यांच्या कविता फार तरल आणि अनेक विषयांना स्पर्श करणाऱ्या असून, त्यात गोयता आहे. संयम हा कोणत्याही कलाकारासाठी महत्त्वाचा असतो. गेली अनेक वर्षे कविता करत असूनही, या दाम्पत्याने पहिला कवितासंग्रह संयमाने काढला, याची विशेष दाखल घ्यायला हवी,’ असे मत निफाडकर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीहारा प्रकाशनाच्या डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी यांनी केले, तर विजय सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. समारंभाचे व्यवस्थापन ओंकार जाधव यांनी केले होते.

(काव्यसंग्रह प्रकाशनावेळी उपेंद्र आणि शर्मिला कुलकर्णी यांनी काही कवितांचे अभिवाचन केले. त्याचा व्हिडिओ सोबत देत आहोत. हा काव्यसंग्रह ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.) 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
सुधीर जहागिरदार About
सुरेख कविता व साद री करण
0
0

Select Language
Share Link