Next
पानिपतच्या लढाईनंतरची परिस्थिती चित्रित करणारा ‘बलोच’
चित्रपटाचे टीझर पोस्टर प्रकाशित
BOI
Monday, March 25, 2019 | 05:06 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘पानिपतची लढाई’ ही भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. या लढाईनंतर गुलामगिरीत गेलेल्या मराठ्यांची शौर्यगाथा सांगणारा ‘बलोच’ हा नवीन चित्रपट येत आहे. अभिनेता प्रविण तरडे चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून नुकतेच चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित करण्यात आले आहे. 

ऐतिहासिक घटना आणि त्या घटनांवर आधारित चित्रपट हा ट्रेंड बॉलीवूडमध्ये नवीन नाही. मात्र आता मराठी सृष्टीतही हा ट्रेंड हळूहळू रुजताना दिसत आहे. मराठीतही यावर काम करणारे दिग्दर्शक पुढे येताना दिसत आहेत. पानिपतची लढाई ही मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्त्वाची आणि हादरवून टाकणारी घटना होती. या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर मावळ्यांना बलुचिस्तानच्या गुलामगिरीत राहावे लागले. 

गुलामगिरीत असतानाही मावळ्यांनी त्या काळात केलेल्या शौर्याची गाथा म्हणजे ‘बलोच’ असल्याचे दिग्दर्शकांनी सांगितले आहे. प्रकाश पवार दिग्दर्शित ‘बलोच’ या चित्रपटाची निर्मिती जितेश मोरे आणि जीवन जाधव यांनी केली आहे. 

प्रवीण तरडेअभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे हेदेखील या चित्रपटात स्क्रीन शेअर करत आहेत. येत्या जून महिन्यात राजस्थानमध्ये चित्रपटाच्या चित्रिकरणास सुरुवात होणार असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रवीण तरडे, भाऊराव कऱ्हाडे यांच्याव्यतिरिक्त विशाल निकम, रोहित आवाळे हेदेखील चित्रपटात भूमिका साकारणार आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 60 Days ago
Are there documents describing their life in captivity ? Where are they located ? Have they been studied , as history ?
0
0

Select Language
Share Link
 
Search