Next
'रीजनल आउटरीच ब्यूरो'द्वारे २९ शहरांत महास्वच्छता उपक्रम
BOI
Friday, January 11 | 01:39 PM
15 0 0
Share this story

महास्वच्छता अभियानाची माहिती देताना महाराष्ट्राच्या रिजनल आऊटरीच ब्युरोचे व गोवा क्षेत्रीय मुख्यालयाचे संचालक (अतिरिक्त कार्यभार) संतोष अजमेरा व अन्य मान्यवर.

पुणे : स्वच्छ भारत अभियान एक कोटी नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र रीजनल  आउटरीच ब्युरो व गोवा क्षेत्रीय मुख्यालयाने महास्वच्छता अभियान कार्यक्रमाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘महाराष्ट्रातील २९ शहरांमधील दोन हजार ९०० शाळा या महास्वच्छता अभियानामध्ये सहभागी होत आहेत; तसेच प्रत्येक शाळेतील २०० विद्यार्थी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. दोन दिवस चालणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी,११ जानेवारी रोजी शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात येत असून, यातील निवडक चित्रांना पुण्यात होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनात स्थान देण्यात येणार आहे. शनिवारी, १२ जानेवारी रोजी विद्यार्थी आपल्या शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष स्वच्छता करतील, त्यानंतर स्वच्छता शपथ घेतली जाईल. यानंतर सामान्य नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी होणाऱ्या स्वच्छता फेरीमध्ये विद्यार्थी सहभागी होतील. या अभियानामध्ये सुमारे ५ लाख विद्यार्थ्यांच्या सहभागाची अपेक्षा आहे. हेच विद्यार्थी स्वच्छतादूत बनून किमान २० दुकानदारांना स्वच्छतेची शपथ देतील आणि अशाप्रकारे एक कोटी नागरिकांचा सहभाग या अभियानामध्ये नोंदविला जाईल,’ अशी माहिती महाराष्ट्राच्या रीजनल आउटरीच ब्युरोचे व गोवा क्षेत्रीय मुख्यालयाचे संचालक (अतिरिक्त कार्यभार) संतोष अजमेरा यांनी नुकत्याच पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

राज्याच्या शिक्षण विभागाकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल अजमेरा यांनी आभार व्यक्त केले. शिक्षण विभागाचे उपसंचालक सुरेश माळी यांनीदेखील कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. या वेळी महास्वच्छता अभियानाचे नोडल अधिकारी डी. व्ही. विनोद कुमार व संगीत-नाटक विभागाचे व्यवस्थापक पानपाटील उपस्थित होते.


‘स्वच्छ भारत अभियानाचा संदेश प्रसारित करण्यात व जनतेमध्ये जनसंपर्क निर्माण करण्यास हा कार्यक्रम मदत करेल,’ अशी आशा अजमेरा यांनी व्यक्त केली. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link