Next
गीतांबरी
BOI
Thursday, November 29, 2018 | 09:58 AM
15 0 0
Share this article:

वनवास, अज्ञातवास संपून पांडव परतल्यानंतर वचनाप्रमाणे त्यांना राज्याचा हिस्सा देण्यात दुर्योधनाने नकार दिला. यातूनच युद्ध उभे ठाकले. धर्म विरुद्ध अधर्माच्या युद्धासाठी कौरव-पांडव समोरासमोर आले; पण आपल्याच आप्तस्वकीयांना मारून विजय मिळवण्याला काय अर्थ आहे, असा विचार अर्जुनाच्या मनात डोकावला; पण धर्मस्थापनेसाठी जे जे आवश्यक आहे ते ते होईल, असा सल्ला देत श्रीकृष्णाने त्याला युद्धभूमीवरच धर्मज्ञान म्हणजे गीता सांगितली. दिव्यदृष्टीप्राप्त संजयने तिचे कथन धृतराष्ट्राला केले. यातून ऐहिक व पारलौकिक उत्कर्षासाठी संदेश श्रीकृष्णाने दिला आहे. गीतेतील तत्त्वज्ञान कादंबरीच्या स्वरूपात ‘गीतांबरी’तून राजेंद्र खेर यांनी वाचकांपुढे मांडले आहे.

प्रकाशन : विहंग प्रकाशन
पृष्ठे : ३२०
मूल्य : ३०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search