Next
‘सुलोचना दीदीं’च्या भूमिकेत दिसणार सोनाली कुलकर्णी
‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’मधील सोनालीच्या फर्स्ट लूकवरून उचलला पडदा...
BOI
Tuesday, September 11 | 03:27 PM
15 0 0
Share this story

सोनाली कुलकर्णी

एक काळ मराठी कलाविश्व गाजवणारे नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी मराठी कलाविश्वात अतिशय महत्त्वाचे योगदान दिले आहे. अशा मातब्बर कलाकाराच्या जीवनप्रवासावर आधारित एक चित्रपट येऊ घातला आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 

डॉ. काशिनाथ घाणेकरअभिनय क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवणाऱ्या या मातब्बर कलाकाराच्या जीवनावर आधारित चित्रपट ही बाबच खूप आनंद देणारी आणि त्याबाबतची उत्सुकता वाढवणारी आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातून घाणेकर यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवर प्रकाश टाकला जाणार आहे. त्यांच्या आयुष्याच्या या वाटचालीत त्या काळातील काही दिग्गज कलावंतांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. ते सगळे त्यांच्या प्रवासाचे साक्षीदार होते. तेव्हा या इतर कलावंतांच्या भूमिकेत कोण दिसणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. 

प्राथमिक स्वरूपात या चित्रपटातील भूमिकांबाबत मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता सुबोध भावे आणि सुमीत राघवन यांच्या भूमिकांवरील पडदा काढला गेला असून आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचीही यासाठी वर्णी लागली आहे. सुमीत राघवनचे नाव निश्चित झाल्यानंतर अभिनेता सुबोध भावे याने स्वतः ट्विट करत सोनाली कुलकर्णी सुलोचना दीदी यांच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगितले आहे. 

सुलोचना दीदीरुपेरी पडद्यावर आईची भूमिका साकारत मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि सर्वांसाठी एक प्रेरणास्थान असणाऱ्या सुलोचना दीदी यांची भूमिका साकारण्याची संधी सोनाली कुलकर्णीला मिळत आहे.  ‘ज्यांच्याकडे बघून नेहमीच चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते, ज्यांचा आशीर्वाद मिळाला की आईचा हात पाठीवर आहे असे वाटते, त्या आमच्या सर्वांच्या आदराचे स्थान सुलोचना दीदी’, अशा प्रकारचे ट्विट करत सुबोधने त्यासोबत सोनालीचा चित्रपटातील सुलोचना दीदी यांच्या भूमिकेतला फोटो सोशल मिडियावर टाकला आहे. 

दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धूरा सांभाळली आहे. १९६०च्या दशकात डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा एक अभिनेता म्हणून झालेला उदय, मराठी रंगभूमीचा चेहरा-मोहरा बदलवून टाकणारी त्यांची कारकीर्द आणि त्यांचा अस्त यांवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. येत्या सात नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link