Next
गोविंद वासुदेव कानिटकर
BOI
Tuesday, January 09 | 01:01 PM
15 0 0
Share this story

मॅक्समुल्लरच्या व्याख्यानांचं भाषांतर करताना त्याच्या नावाचंही ‘मोक्षमुल्लर’ असं कल्पकेतेने मराठीकरण करणारे कवी आणि भाषांतरकार गोविंद वासुदेव कानिटकर यांचा नऊ जानेवारी हा जन्मदिवस. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
..... 

नऊ जानेवारी १८५४ रोजी पुण्यात जन्मलेले गोविंद वासुदेव कानिटकर हे कवी आणि भाषांतरकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना चित्रकला आणि संगीतातही गती होती.

त्या काळच्या परंपरेप्रमाणे त्यांनी काही दीर्घकाव्यं लिहिली होती. अकबर बादशाह, श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा वध, संमोहलहरी अशी दीर्घकाव्यं आणि कविकूजन हा त्यांच्या कवितांचा संग्रह, तसंच ‘भट्ट मोक्षमुल्लरकृतधर्मविषयक व्याख्याने’ हे व्याख्यानांचं भाषांतर प्रसिद्ध आहे. 

शेक्सपियरच्या ‘हॅम्लेट’, ‘कोरिओलेनस’ आणि ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकांचे, तसंच जॉन स्ट्युअर्ट मिलच्या ‘सब्जेक्शन ऑफ वूमन’चे त्यांनी केलेले अनुवाद गाजले होते.

१९०६ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

चार जून १९१८ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link